मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. वयाच्या ७७ व्या वर्षी रवींद्र महाजनी यांनी अखेरचा श्वास घेतला. रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रवींद्र महाजनी यांचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झालं हे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर येईल. झगमगत्या विश्वात रवींद्र महाजनी यांच्याप्रमाणे अन्य सेलिब्रिटींचा मृतदेह देखील बंद खोलीत आढळला.
‘द डर्टी’ सिनेमात अभिनेता विद्या बालन हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिच्यासोबत देखील असंच काही झालं होतं. वयाच्या ३३ व्या वर्षी आर्या हिचा मृतदेह तिच्या राहत्याघरी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. दोन दिवसांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अभिनेत्रीचा मृतदेह पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. तिथे तिचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. अभिनेत्रीच्या नाकातून रक्त आल्याचं पोलिसांना दिसून आलं.
एक काळ बॉलिवूड गाजवलेल्या अभिनेत्री परवीन बाबी यांच्या निधनाबद्दल आज सर्वांना माहिती आहे. परवीन बाबी एका गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. २० जानेवारी २००५ मध्ये परवीन बाबी यांचं निधन झालं. धक्कादायक गोष्ट म्हणजे तीन दिवस त्यांच्या मृतदेह बंद खोलीत होता. अखेर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी परवीन बाबी यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे महेश आनंद यांचं २०१९ मध्ये निधन झालं. निधनाच्या दोन दिवसांनंतर अभिनेत्याचा मृतदेह त्यांच्या बंद खोलीत आढळला. शेवटच्या क्षणी देखील महेश आनंद यांना कुटुंबियांची साथ मिळाली नाही.
अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासोबत रज्जो सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका चौधरी हिचा मृतदेह देखील मुंबईतील तिच्या राहत्या घरी आढळला. निधनाच्या चार दिवसांनंतर अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती समोर आली. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
आता रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाती माहिती देखील दोन ते तीन दिवसांनंतर कळली. ज्यामुळे फक्त चाहत्यांमध्येच नाही तर मराठी सिनेविश्वात देखील मोठी खळबळ माजली आहे.
रवींद्र महाजनी राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले.