Ravindra Mahajani यांच्या निधनाबद्दल पत्नीला अद्याप का सांगितलं नाही? मोठं कारण समोर

| Updated on: Jul 15, 2023 | 10:36 AM

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ; त्यांच्या पत्नीला अद्याप का सांगितलं नाही पतीच्या मृत्यूचं सत्य? सध्या सर्वत्र रविंद्र महाजनी यांच्या निधनाची चर्चा...

Ravindra Mahajani यांच्या निधनाबद्दल पत्नीला अद्याप का सांगितलं नाही? मोठं कारण समोर
Follow us on

पुणे | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. फक्त चाहतेच नाही तर, संपूर्ण सिनेविश्वाला रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला आहे. रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रवींद्र महाजनी राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. आता रविंद्र यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पोहोचला आहे. घटनास्थळी रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी पोहोचला आहे. पण रवींद्र महाजनी यांच्या निधनाची माहिती त्यांच्या पत्नीला देण्यात आलेली नाही.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पण त्यांच्या पत्नीची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना अद्याप सांगितले नाही. शिवाय रविंद्र महाजनी यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे होणार हे देखील अद्याप समोर आलेलं नाही.

रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाती माहिती देखील दोन ते तीन दिवसांनंतर कळली. ज्यामुळे फक्त चाहत्यांमध्येच नाही तर मराठी सिनेविश्वात देखील मोठी खळबळ माजली आहे. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे. मात्र या सर्व प्रकरणात रवींद्र महाजनी गेल्या काही महिन्यांपासून एकटे का राहत होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुलगा इतका मोठा स्टार असूनही महाजनी हे तळेगाव दाभाडेला एकटे भाडेतत्त्वावर का राहत होते, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.