Razakar | मुलींवर अत्याचार, पूजेच्या भांड्यात थुंकलं..हैदराबाद नरसंहारावरील ‘रजाकार’ चित्रपटावरून वाद

| Updated on: Sep 19, 2023 | 3:54 PM

रजाकार या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावरून नवीन वा सुरू निर्माण झाला आहे. या टीझरला विरोध करण्यात येत आहे. त्याचसोबत या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.

Razakar | मुलींवर अत्याचार, पूजेच्या भांड्यात थुंकलं..हैदराबाद नरसंहारावरील रजाकार चित्रपटावरून वाद
Razakar
Image Credit source: Youtube
Follow us on

हैदराबाद | 19 सप्टेंबर 2023 : आगामी ‘रजाकार’ या तेलुगू चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा हैदराबाद नरसंहारावर आधारित आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा हैदराबाद मात्र स्वतंत्र का होऊ शकला नाही, याबद्दलची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यावेळी हैदराबादमध्ये निजामचं राज्य होतं. तिथे एक असा शासक होता, ज्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेची स्थापना कासिम रिझवीने केली होती. त्यानेच मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लमीन नावाची पार्टी बनवली होती.

‘रजाकार’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्यावरून वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची तुलना विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’शी केली जात आहे. या 1 मिनिट 43 सेकंदांच्या टीझरमध्ये निजाम शासनाच्या वेळी हिंदूंना कशा पद्धतीने त्रास दिला जायचा, त्याची झलक दाखवण्यात आली आहे. कासिम रिझवी हा प्रत्येक घरावर इस्लामी झेंडा लावण्याचे आदेश देतो. त्यासोबतच तो निजामला म्हणतो की हैदराबाद हे इस्लामी राज्य आहे. या टीझरमध्ये निजामला असं म्हणताना दाखवलं गेलंय की, “चारही बाजूंना मशिदी बांधली गेली पाहिजेत.” याशिवाय टीझरमध्ये हिंदूंचा नरसंहारही दाखवण्यात आला आहे.

पहा टीझर

हे सुद्धा वाचा

एका सीनमध्ये इस्लामी कट्टरपंथीला एका पूजाऱ्याच्या पूजेच्या भांड्यात थुंकताना दाखवलं गेलंय. हिंदू महिलांसमोरच त्यांच्या कुटुंबातील पुरुषांना पाण्यात फेकलं जातंय. ‘अल्लाहूँ अकबर’च्या घोषणा दिल्या जात आहेत. चित्रपटाचा हा टीझर प्रदर्शित होताच तेलंगणाच्या ‘मजलिस बचाओ तहरीक’चे (MBT) प्रवक्ते अमजद उल्लाह खान यांनी सरकारला त्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट केवळ कल्पनांवर आधारित आहे. त्यात लोकांमध्ये तिरस्कार पसरवण्याची क्षमता आहे, असं म्हणत त्यांनी बंदीची मागणी केली आहे.