मुंबई : सुदिप्तो सेन यांचा द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर आणि रिलीज झाल्यानंतरही मोठा वाद हा बघायला मिळतोय. द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) सतत चर्चेत आहे. मुळात म्हणजे चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ही सातत्याने केली जात होती. दोन राज्यांमध्ये तर थेट चित्रपटवर बंदी देखील घालण्यात आली. मात्र, कोर्टाने महत्वाचा निकाल देत थेट पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) द केरळ स्टोरी चित्रपटावरील बंदी उठवली आहे. तामिळनाडू राज्यात अजूनही चित्रपटावर बंदी आहे.
एकीकडे मोठा विरोध द केरळ स्टोरी चित्रपटाला होताना दिसत आहे, तर दुसरीकडे मात्र प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद हा द केरळ स्टोरी चित्रपटाला देताना दिसत आहेत. द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसला. द केरळ स्टोरी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये अजूनही मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.
द केरळ स्टोरी चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत असून अदा शर्मा हिचे अभिनयासाठी काैतुक देखील केले जात आहे. द केरळ स्टोरी चित्रपटात असिफाची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनिया बालानी हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये तिने द केरळ स्टोरी चित्रपट बघितल्यानंतर तिच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे.
सोनिया बालानी म्हणाली की, माझे आई वडिल चित्रपटामध्ये इतके जास्त गुंतले की, त्यांना माझा विसर पडला. चित्रपट बघितल्यावर त्यांना खूप त्रास झाला. कारण सोनियाने चित्रपटात आपल्या मैत्रिणींसोबत जे केले ते अत्यंत चुकीचे होते आणि त्यांना यामुळे त्रास झाला. त्यांनी मला विचारले की तू तुझ्या माैत्रिणींसोबत असे का केले? द केरळ स्टोरी चित्रपटात सोनिया बालानी ही विलनच्या भूमिकेत आहे.
सोनिया बालानी पुढे म्हणाली की, माझे आई वडिल नेहमीच मला सपोर्ट करतात. त्यांनी चित्रपटासाठी माझ्या अभिनयाचे काैतुक देखील केले आहे. अदा शर्मा, सोनिया बालानी यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसल्या होत्या. सुदिप्तो सेन यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिलीये. पुढील काही दिवस चित्रपट कमाईमध्ये धमाका करेल असे सांगितले जात आहे.