मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सध्या तूफान चर्चेत आहेत. यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हा टोकाला गेल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, यांच्या वादाचे कारण हे कळू शकले नाहीये. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय हिच्या काही वाईट सवयीबद्दल बोलताना श्वेता बच्चन ही दिसली. इतकेच नाही तर थेट मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय हिच्या काही चुकींच्या सवयीबद्दल श्वेता बच्चन हिने सांगितले. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे देखील रिलेशन चांगले नसल्याची सतत चर्चा असते.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये देखील सार्वजनिक ठिकाणी अनेकदा वाद झाले आहेत. थेट सोनम कपूर हिच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पापाराझी हे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना एकसोबत फोटो काढण्यास सांगत होते. मात्र, अभिषेक बच्चन याला ऐश्वर्या राय हिच्यासोबत फोटो काढायचे नव्हते.
ऐश्वर्या राय ही देखील अभिषेक बच्चन याला फोटोसाठी बोलावत होती. मात्र, अभिषेक बच्चन याला इतका जास्त राग येतो की, तो थेट रागाने तिथून निघून गेला. अभिषेक बच्चन याचे हे रूप पाहून तिथे उपस्थित असलेले लोक हे हैराण झाले. यानंतर थेट ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्या मागे जाताना देखील दिसली.
2023 मध्ये जयपूर येथे झालेल्या कबड्डी मॅचमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. हा व्हिडीओ ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा होता. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिला काहीतरी सांगताना दिसला. मात्र, त्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करत दुसरीकडे बघताना ऐश्वर्या राय ही दिसली.
अशाप्रकारचे बरेच फोटो आणि व्हिडीओ हे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे व्हायरल होताना दिसले. सतत घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, ऐश्वर्या राय किंवा अभिषेक बच्चन यांनी घटस्फोटाच्या चर्चांवर काहीच भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जात असल्यापासून चाहत्यांमध्ये एक चिंतेंचे वातावरण हे बघायला मिळतंय.