मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात. मात्र, या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी हिच्यावर होत नाही. उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) असून तिने टीव्ही मालिकांपासून आपल्या करिअरची सुरूवात केली. सुरूवातीला उत्तर प्रदेशमध्ये असताना तिने माॅडलिंगला सुरूवात केली होती. मात्र, याबद्दल तिच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती. उर्फी जावेद हिने अगोदरच ठरवले होते की, आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे.
नुकताच दिलेल्या एक मुलाखतीमध्ये उर्फी जावेद हिने मोठा खुलासा केला आहे. उर्फी जावेद हिने सांगितले की, ज्यावेळी ती उत्तर प्रदेशमध्ये होती, त्यावेळी ती माॅडलिंग करायची. मात्र, घरून निघताना ती अत्यंत साध्या कपड्यांमध्ये निघायची. बरेच दिवस तिच्या घरच्यांना माहिती देखील नव्हते की, ती माॅडलिंग करत आहे.
उर्फी जावेद म्हणाली की, मी एका मुस्लीम घरात वाढलेली आहे. आमच्या घरी माॅडलिंग वगैरे अजिबात चालत नव्हते. एकदा माझा फोटो थेट पाॅर्न साईटवर कोणीतरी अपलोड केला होता. तो फोटो माझ्या वडिलांनी बघितला. त्यानंतर त्यांनी मला मारहाण केली. मारहाण म्हणजे एखादी चापट वगैरे अजिबात नाही तर बेशुध्द होऊपर्यंत मारले गेले होते.
माझ्या वडिलांना वाटत होते की, मी कुटुंबियांचे नाव खराब करत आहे. अनेकदा मारहाण झाल्याचे देखील उर्फी जावेद हिने सांगितले. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
उर्फी जावेद हिला घरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासून मिळालीये. उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाली आणि तिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच उर्फी जावेद ही दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये उर्फी जावेद ही कमावते.
नेहमीच अतरंगी लूकमध्ये उर्फी जावेद ही दिसते. मात्र, तिच्या कपड्यांमुळे ती नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात अंदाजा नसतो. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने थेट झाडाच्या सालीपासून तयार केलेले कपडे घालते होते.