रेखा यांची लेक कोण? जी त्यांना म्हणायची मम्मा… पण तिने 2 वर्षांपूर्वी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Dec 09, 2024 | 1:39 PM

Rekh on Daughter: रेखा यांनी अनेक वर्षांनंतर सांगितलं मोठं सत्य, कोण आहे रेखा यांची मुलगी? दोन वर्षांपूर्वी त्यांच्या लेकीने घेतला अखेरचा श्वास... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या वक्तव्याची चर्चा...

रेखा यांची लेक कोण? जी त्यांना म्हणायची मम्मा... पण तिने 2 वर्षांपूर्वी घेतला अखेरचा श्वास
Follow us on

Rekh on Daughter: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. रेखा त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगत असतात.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये देखील रेखा यांनी त्यांच्या आयुष्यातील फार महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. कपिलच्या शोमध्ये रेखा यांनी अशा एका गोष्टीचा खुलासा केला. ज्याबद्दल अद्याप कोणालाच माहिती नाही. कपिल शर्माच्या शोमध्ये कपिल याने रेखा यांना भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची कॉपी करण्यास सांगितलं.

यावर रेखा यांनी लता मंगेशकर यांच्यासंबंधी एक किस्सा सांगितला. रेखा म्हणाल्या, ‘लता मंगेशकर यांनी मला त्यांच्या बर्थडे पार्टीसाठी बोलावलं होतं. तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमोर मी म्हणाली, ‘लता दीदी मी तुमची फार मोठी चाहती आहे… जर देव माझं ऐकत असेल तर, पुढच्या जन्मी मला लता यांच्यासारखी मुलगी नक्की द्या…’ असं रेखा म्हणाल्या.

 

 

यावर रेखा म्हणाल्या, ‘पुढच्या जन्मी का? याच जन्मी मी तुमची मुलगी आहे. तेव्हा लता दीदी माझ्याकडे आल्या आणि मला मम्मा म्हणू लागल्या… तो दिवस आणि आजही माझ्या कानांमध्ये लता दीदी यांचा मम्मा-मम्मा असा आवज घुमतो…’ असा खुलासा करत रेखा यांनी चाहत्यांचं मन जिंकलं…

लता मंगेशकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2022 मध्ये लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. आज लता मंगेशकर आपल्या सोबत नाहीत. पण त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहते आणि कुटुंबियांसोबत आहेत.

‘मुझसे जुदा होकर’, ‘मैं तेरा दुश्मन’, ‘कोई लडका हैं’, ‘जिसका मुझे था इंतजार’, ‘हमको हमीसे चुरालो…’ अशी असंख्या गाणी भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायली. आज दीदी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांनी गायलेली गाणी आयुष्य जगायला शिकवतात.