‘वह पुरुषों को सिग्नल देती हैं..’, जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईने साधला रेखा यांच्यावर निशाणा

| Updated on: Dec 10, 2024 | 2:34 PM

Rekha Love Life: काही लोकांच्या नजरेत रेखा 'डायन...', प्रसिद्ध अभिनेत्यासोबत रेखा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा, रेखा यांच्यावर निशाणा साधत अभिनेत्याची आई म्हणाली, 'वह पुरुषों को सिग्नल देती हैं..',

वह पुरुषों को सिग्नल देती हैं.., जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईने साधला रेखा यांच्यावर निशाणा
Follow us on

Rekha Love Life: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज रेखा कोणत्या सिनेमात दिसत नसल्या तरी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. रेखा यांनी सर्वांसमोर बिग बी यांच्यावर असलेलं प्रेम देखील व्यक्त केलं आहे. सांगायचं झालं तर, रेखा यांच्या नावाची चर्चा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत देखील रंगली होती. तेव्हा अभिनेत्रीच्या आईने रेखा यांच्यावर निशाणा साधला होता.

ज्या अभिनेत्यासोबत रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली होती, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता संजय दत्त आहे. एक काळ असा होता जेव्हा संजूबाबा आयुष्यात अनेक संकटांचा सामना करत होता. तर रेखा बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर होत्या. दरम्यान, ‘जमीन आसमान’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. तेव्हा रेखा यांना संजूबाबाच्या ड्रग्स सेवनाबद्दल देखील माहिती झालं होतं. अशात रेखा यांनी संजय दत्तची साथ दिली.

दरम्यान, रेखा आणि संजूबाबा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. दोघांनी देखील यावर मौन बाळगलं होतं. पण संजय दत्त यांच्या आई नरगीस दत्त यांनी रेखा यांच्यावर निशाणा साधला होता. 1976 मध्ये नरगीस यांनी रेखा यांच्याविरोधतात वादग्रस्त वक्तव्य केलं.

रेखा कायम पुरुषांना सिग्नल देत असते… एवढंच नाही तर, नरगीस रेखा यांना ‘डायन’ देखील म्हणाल्या होत्या. नरगीस पुढे म्हणाल्या होत्या की, रेखा यांना आयुष्यात एका सक्षण माणसाची गरज आहे. तेव्हा देखील रेखा तुफान चर्चेत आल्या होत्या.

नरगीस दत्त यांचं रेखा यांच्या विरोधात वक्तव्य…

नरगीस दत्त म्हणाल्या होत्या, ‘रेखा कायम पुरुषांना संकेत देत असतात, की त्या सहज उपलब्ध आहेत. काही लोकांच्या नजरेत त्या ‘डायन’पेक्षा कमी नाहीत. कधी – कधी मला असं वाटतं मी त्यांना समजू शकते. मी देखील माझ्या काळात अनेक मुलांसोबत काम केलं आहे. मला वाटते की त्या बऱ्याच मानसिक समस्यांमध्ये हरवल्या आहेत, त्यांना एक सक्षम माणूस हवा आहे.’ असं देखील नरगीस म्हणाल्या होत्या.