हनीमूनला गेलेल्या रेखा यांना नवऱ्याचं धक्कादायक सत्य कळलं तेव्हा…, 2 अपयशी लग्नांतर जगतात एकट्याच

| Updated on: Aug 13, 2024 | 2:06 PM

Rekha Married Life: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, त्यानंतर उद्योजकासोबत रेखा यांचा उद्ध्वस्त झाला संसार, हनीमूनच्या रात्री अभिनेत्रीला नवऱ्याचं धक्कादायक सत्य कळलं तेव्हा..., रेखा यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात...

हनीमूनला गेलेल्या रेखा यांना नवऱ्याचं धक्कादायक सत्य कळलं तेव्हा..., 2 अपयशी लग्नांतर जगतात एकट्याच
Follow us on

बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रेखा आज वयाच्या 69 व्या वर्षी एकट्याच आयुष्य जगत आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा रेखा यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. तर रेखा दोन वेळा विवाहबंधनात अडकल्या. पण त्यांना वैवाहिक आयुष्याचा आनंद कधी घेता आलाच नाही. लग्नानंतर देखील अनेक संकटांचा सामना रेखा यांनी केला. ज्यामुळे दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर रेखा यांनी कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही.

रेखा यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, रेखा यांनी 4 मार्च 1990 मध्ये उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर रेखा यांच्या पतीने स्वतःचं आयुष्य संपवलं. लग्नानंतर सहा महिन्यात पतीचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांनी रेखा यांच्यासाठी वाईट शब्दांचा वापर केला.

अखेर रेखा यांनी मुलाखतीच्या माध्यमातून घडलेली घटना सर्वांना सांगितली. मुकेश यांना रेखा यांच्याकडून घटस्फोट हवा होता. रेखा यांनी कधीच पतीकडून घटस्फोट मागितला नाही. ‘अरेंज मॅरेजसाठी माझी उत्सुकता ठिक नव्हती… पण मी कधीच नात्यात हार मानली नाही…’

हे सुद्धा वाचा

रेखा पुढे म्हणाल्या, ‘जर दोन व्यक्तींमध्ये काही मतभेद असतील आणि ते दूर होणार नसतील तर विभक्त होणं एकच पर्याय असतो… लंडन याठिकाणी आम्ही हनीमूनसाठी गेलो होतो. पण तेव्हाच मुकेश सोबत माझ्या नात्यामध्ये असलेले फरक मला दिसून आले…’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.

मीडिया रिपोर्टनुसार, रेखा दोन वेळा विवाहबंधनात अडकल्या. दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबत देखील रेखा यांचं लग्न झालं होतं. पण विनोद मेहरा आणि रेखा यांच्या नात्याचा स्वीकार कधीच अभिनेत्याच्या आईने केला नाही. त्यानंतर रेखा यांनी कधीच लग्नाचा निर्णय घेतला नाही.

विनोद मेहरा आणि रेखा यांनी गुपचूप लग्न उरकलं होतं. पण विनोद मेहरा यांनी कधीच नात्याचा स्वीकार केला आहे. 2004 मध्ये झालेल्या मुलाखतीत विनोद यांनी लग्नाच्या सर्व चर्चा फेटाळल्या होत्या. रेखा यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार आले. आज वयाच्या 69 व्या वर्षी त्या एकट्याच जगत आहेत.