‘रेखा म्हणजे फक्त Timepass…’, अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर रेखा यांनी घेतलेला ‘तो’ मोठा निर्णय

| Updated on: Dec 02, 2024 | 1:48 PM

Rekha Love Life: रेखा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, 'रेखा म्हणजे फक्त Timepass...', त्या दिवसानंतर रेखा यांनी घेतलेला मोठा निर्णय, रेखा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

रेखा म्हणजे फक्त Timepass..., अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर रेखा यांनी घेतलेला तो मोठा निर्णय
Follow us on

Rekha Love Life: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या चाहत्यांची संख्या आजही तितकीच मोठी आहे. चाहत्यांमध्ये रेखा यांच्या सौंदर्याची क्रेझ आदजी आहे. सांगायचं झालं तर, रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या. प्रोफेशनल आयुष्यात रेखा यांना प्रचंड यश मिळालं, पण खासगी आयुष्यात मात्र रेखा यांना अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. रेखा यांच्या आयुष्यात अनेक पुरुषांची एन्ट्री झाली पण कोणत्याच अभिनेत्यासोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे.

रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. अनेक सर्वांसमोर रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं. पण बिग बी यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर भावना व्यक्त केल्या नाही. दरम्यान, असा देखील एक अभिनेता होता, ज्याच्यासोबत देखील रेखा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला…

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिनेत्याने ‘रेखा म्हणजे फक्त timepass…‘ असं वक्तव्य देखील केलं होतं. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते जितेंद्र आहे. एक काळ असा होता, जेव्हा रेखा, जितेंद्र यांच्या प्रेमात होत्या. पण त्यांनी जितेंद्र यांना असं काही बोलताना ऐकलं ज्यामुळे अभिनेत्रीला प्रचंड दुःख झालं.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, रेखा यांची बायोग्राफी ‘रेखा – द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात लेखक यासिर उस्मान यांनी ही घटना लिहिली आहे. एक काळ होता, जेव्हा जितेंद्र आणि रेखा यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर रेखा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, ‘बेचारा’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रेखा आणि जितेंद्र शिमला याठिकाणी शुट करत होते. तेव्हा जिंतेद्र यांना बोलताना रेखा यांनी ऐकलं होतं. रेखा सोबत फक्त टाईमपास करत आहे… असं जितेंद्र म्हणाले हेते… असं सांगितलं जातं. ज्यामुळे रेखा यांना प्रचंड दुःख झालं आणि त्या मेकअप रुममध्ये जाऊन रडू लागल्या… त्यानंतर रेखा यांनी जितेंद्र यांच्यासोबत असलेलं नातं कायमसाठी संपवलं.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांचं रेखा यांच्यासोबत नातं…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत देखील रेखा याचं नाव जोडण्यात आलं. रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर इमरान खान म्हणाले होते, ‘काही काळासाठी मला रेखा यांचा सहवास आवडला होता. आम्ही एंजॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो… मला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं नव्हतं… ‘ असं देखील इमरान खान म्हणाले होते.