मुंबई : अभिनय, सौंदर्य, डान्स, अदा… या सर्व गोष्टींमुळे अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी फक्त चाहत्यांच्या मनावर नाही तर, अनेक सेलिब्रिटींच्या मनावर देखील राज्य केलं. एक काळ असा होता, जेव्हा रेखा यांचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. पण नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. महानायक अभिनेताभ बच्चन आणि अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबत देखील रेखा यांच्या नावाची तुफान चर्चा झाली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्याची आजही चाहत्यांमध्ये तुफान चर्चा रंगलेली असते. मोठ्या पडद्यावर रेखा यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचल्या पण खासगी आयुष्यात रेखा यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. फक्त रेखा यांनाच नाही तर त्यांची बहीण धनलक्ष्मी यांनी देखील खासगी आयु्ष्यात चढ-उतार पाहिले. खरं प्रेम मिळवण्यासाठी रेखा यांची बहीण धनलक्ष्मी यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण बहिणीच्या खासगी आयुष्यात रेखा खलनायकाची भूमिका निभावत होत्या.
रेखा (Rekha Sister Dhanlaxmi) यांची बहीण धनलक्ष्मी यांचं बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनाायक आणि अभिनेते तेज सप्रू यांच्यावर जीव जडला होता. तेज यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला. तेज त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयु्ष्यामुळे तुफान चर्चेत आले. तेज विवाहित असताना त्यांना रेखा यांच्या बहिणीवर प्रेम झालं होतं.
पण तेज आणि धनलक्ष्मी यांचं नातं रेखा यांना मान्य नव्हतं. कारण तेज विवाहित होते आणि आपल्या बहिणीसोबत काही वाईट होईल अशी भीती रेखा यांना सतावत होती. पण रेखा यांच्या आई आणि अभिनेत्री पुष्पावली यांची तेज आणि धनलक्ष्मी यांच्या मान्यता होती. तेज आपल्या घराचे जावई व्हावेत अशी रेखा यांच्या आईची इच्छा होती. पण तेज यांचं घटस्फोट देखील झाला नव्हता म्हणून तेज आणि धनलक्ष्मी यांच्या नात्याला रेखा यांचा विरोध होता.
रेखा यांचा नात्याला विरोध होता.. कारण मी विवाहित होतो…असं वक्तव्य खुद्द तेज यांनी एका मुलाखतीत केलं होतं. तेज म्हणाले, ‘प्रत्येकाचं नातं हे देव ठरवत असतो…’ तेज यांच्या नशिबात दुसरी पत्नी म्हणून रेखा यांची बहीण धनलक्ष्मी होत्या. तेज यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर खलनायकाने दुसऱ्या लग्नासाठी तयारी सुरु केली.
पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर रेखा यांची तेज आणि धनलक्ष्मी यांच्या नात्याला मान्यता मिळाली. शिवाय तेज यांच्या आई – वडिलांना देखील मुलाचं धनलक्ष्मी यांच्यासोबत असलेलं नात मान्य होतं. तेज आणि धनलक्ष्मी यांच्या नात्याला सर्वांची मान्यता मिळाल्यानंतर १९८७ साली दोघांनी लग्न केलं.