मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या नवीन चित्रपट ‘टायगर 3’ च्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाला. रशियाला जाण्यापूर्वी त्याला सीआयएसएफ जवानाने मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी थांबवले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया या सीआयएसएफ जवानाचं प्रचंड कौतुक झालं, या जवानावर कारवाई झाल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र आता सीआयएसएफच्या स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
सीआयएसएफच्या वतीनं असं सांगण्यात आलं आहे की त्या अधिकाऱ्याला कोणतीही शिक्षा झालेली नाही, तर त्याचा सन्मान करण्यात आला. सीआयएसएफकडून नुकतंच एक ट्विट ही माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित अधिकाऱ्याला म्हणजेच सोमनाथ मोहंतीला त्याच्या कर्तव्याच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल बक्षीस देण्यात आलं आहे.
वास्तविक, सीआयएसएफ अधिकाऱ्याने सलमानला मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी थांबवले. त्याचा एक व्हिडीओ विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सीआयएसएफ अधिकाऱ्याचे कौतुक केले जात आहे. हा जवान सलमानच्या स्टारडमच्या प्रभावाखाली आला नाही आणि त्याला सामान्य नागरिकासारखी वागणूक दिली. या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, सलमानचे चाहते त्याचे विमानतळावर स्वागत करत आहेत आणि फोटोग्राफर त्याचे फोटो काढत आहेत.
पाहा व्हिडीओ
असे सांगितले जात आहे की, सलमान खान रशियामध्ये सुमारे 2 महिने ‘टायगर 3’ चे शूटिंग करणार आहे. या आधी सलमान खानचे एकाच नावाचे दोन चित्रपट झाले आहेत. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. इमरान हाश्मी या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
सलमान ‘टायगर-3’ चे शुटींग पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतात परत येईल. कारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ‘बिग बॉस’ टीव्हीवर प्रदर्शित होईल, जो सलमान होस्ट करणार आहे. त्याची डिजिटल आवृत्ती सध्या करण जोहर होस्ट करत आहे. ‘बिग बॉस’ व्यतिरिक्त, सलमान महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या
छोट्या पडद्यावरून थेट बॉलिवूडमध्ये धडक; जाणून घ्या नुसरत भरूचाची नेटवर्थ