रिया चक्रवर्ती हिच्या भावाला मोठा दिलासा, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कोर्टाकडून

| Updated on: Sep 17, 2023 | 4:36 PM

रिया चक्रवर्ती हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप केले. रिया चक्रवर्ती हिला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही आली.

रिया चक्रवर्ती हिच्या भावाला मोठा दिलासा, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कोर्टाकडून
Follow us on

मुंबई : रिया चक्रवर्ती ही गेल्या तीन वर्षांपासून सतत चर्चेत आहे. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिचे नाव सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर प्रचंड चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांकडून रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळ रिया चक्रवर्ती हिच्यावर आली. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात रिया चक्रवर्ती हिचे पाय खोलात असल्याचे सुरूवातीपासूनच स्पष्ट झाले. रिया चक्रवर्ती हिच नाही तर या प्रकरणात तिचा भाऊ शोविक याच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले.

शोविकही काही महिने जेलमध्ये राहिला. सुशांत सिंह राजपूत याने आता जगाचा निरोप घेऊन तीन वर्षे झाली आहेत. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर आता परत एकदा रिया चक्रवर्ती ही प्रेमात पडलीये. रिया चक्रवर्ती ही कायमच सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. रिया चक्रवर्ती हिने काही दिवसांपूर्वीच काही फोटो शेअर करत दुसऱ्यांदा प्रेमात पडल्याचे कबुल केले.

नुकताच रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक याला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शोविक याला विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना पासपोर्ट वापरण्याची परवानगी न्यायालयाने दिली नव्हती. मात्र, आता रिया चक्रवर्ती हिच्या कुटुबियांना न्यायालयाकडून अत्यंत मोठा दिसाला हा मिळाला आहे.

मुळात म्हणजे रिया चक्रवर्ती हिच्याप्रमाणेच तिचा भाऊ शोविक यालाही सुशांत सिंग राजपूतच्या ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स विभागाने आरोपींच्या नावात समावेश केला होता. यामुळे शोविक याला विदेशात जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली नव्हती. मात्र, आता शोविक याला मोठा दिलासा मिळाल्याचे बघायला मिळत आहे.

शोनिक याला 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत म्हणजेच एकून 7 दिवसांसाठी ऑस्ट्रेलियात जायचे आहे. यासाठी त्याने न्यायालयाकडे परवानगी मागितली. विशेष म्हणजे न्यायालयाने काही अटींवर त्याला ही परवानगी दिलीये. ऑस्ट्रेलियात तो नेमका कुठे जाणार तेथील पत्ता. सोबतच फोन नंबर आणि अजूनही काही गोष्टी त्याला न्यायालयामध्ये जमा कराव्या लागणार आहेत. यामुळेच हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. तीन वर्षे शोविका हा विदेशात गेला नाही.