‘Madhuri Dixit मुळे माझ्या बहिणीचा संसार मोडला’, ‘त्या’ गोष्टीमुळे धक धक गर्ल आजही चर्चेत

| Updated on: Feb 21, 2023 | 4:12 PM

स्वतःचं वैवाहिक आयुष्य आनंदाने जगणाऱ्या माधुरी दीक्षित हिच्यावर 'या' अभिनेत्रीचा संसार मोडल्याचा ठपका; धक धक गर्लच्या आयुष्यातील 'त्या' गोष्टीमुळे सर्वत्र खळबळ

Madhuri Dixit मुळे माझ्या बहिणीचा संसार  मोडला, त्या गोष्टीमुळे धक धक गर्ल आजही चर्चेत
Follow us on

Madhuri Dixit Love life : अभिनेत्री माधुरी दीक्षित (madhuri dixit) कामय तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आज अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीने धक धक गर्लवर गंभीर आरोप केले होते. अनेक वर्षांपूर्वी माधुरी दीक्षित हिचं नाव अभिनेता संजय दत्त याच्यासोबत जोडण्यात आलं. पण तेव्हा संजय विवाहित होता. संजयचं पहिलं लग्न अभिनेत्री रिचा शर्मा हिच्यासोबत झालं होतं. रिचा हिने संजय दत्त सोबत असलेलं नातं टिकवण्याचा प्रचंड प्रयत्न केला पण त्यांचं नातं टिकलं नाही.

तेव्हा संजय, माधुरी दीक्षितच्या प्रेमात पूर्ण बुडालेला होता. संजय दत्तसोबत तुटलेल्या नात्याला माधुरी जबाबदार असल्याचं रिचाने अनेकदा सांगितलं. फक्त रिचाच नाहीतर तिच्या बहिणीने देखील माधुरी हिच्यावर संताप व्यक्त केला. ‘Madhuri Dixit मुळे माझ्या बहिणीचा संसार मोडला’ असं रिचाच्या बहिणीने एका मुलाखतीत सांगितलं.

हे सुद्धा वाचा

रिचा शर्मा हिची बहीण एना शर्मा हिने सांगितलं की, ‘संजय आणि माधुरी चांगले मित्र होते. पण आम्ही कधीही त्यांच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला नाही. पण माधुरीने माझ्या बहणीचा संसार मोडला…’ असं देखील रिचा शर्मा हिच्या बहिणीने सांगितलं. आज रिचा शर्मा जिवंत नसली तरी संजूबाबा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे ती कायम चर्चेत असते.

रिचा शर्मा हिचा कर्करोगामुळे निधन झालं. माधूरी आणि संजय यांच्या नात्याचा खुलासा खुद्द रिचाने केला होता. रिचा म्हणाली, संजय याला माधुरी दीक्षित हिने भावनिक पाठिंबा दिला होता. जेव्हा दोघं विभक्त झाले, तेव्हा संजयला प्रचंड वाईट वाटलं. तेव्हा संजय माधुरीवर प्रचंड प्रेम करायचा. पण याबाबत कधीही संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी वक्तव्य केलं नाही. (bollywood love story)

जेव्हा मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटात संजय दत्त याचं नाव पुढे आलं, तेव्हा माधुरी दीक्षित हिने संजूबाबाची साथ सोडली. तेव्हा पासून कधीही दोघे एकत्र आले नाही. आता संजय दत्त आणि माधूरी दीक्षित त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत.

संजय दत्त कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. एवढंच नाही तर, अनेक चढ-उतार अभिनेत्याच्या आयुष्यात आले. पण कोणत्याही प्रसंगाचा सामना संजूबाबाने मोठ्या धैर्याने केला. वाद आणि संजय दत्त यांचं जुनं नातं आहे. तर दुसरीकडे संजूबाबाच्या अफेअरबद्दल देखील तुफान चर्चा रंगल्या.