शुबमन गिल 10 वर्ष मोठ्या अभिनेत्रीसोबत हॉटेलमध्ये करणार लग्न? अखेर तिने सोडलं मौन

| Updated on: Aug 10, 2024 | 11:16 AM

Shubman Gill Marriage: सारा अली खान, सारा तेंडुलकर नाही तर, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शुबमन गिले याचे 'प्रेमसंबंध', क्रिकेटर 10 वर्ष मोठ्या अभिनेत्रीसोबत करणार लग्न? चर्चा रंगत असताना अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन...

शुबमन गिल 10 वर्ष मोठ्या अभिनेत्रीसोबत हॉटेलमध्ये करणार लग्न? अखेर तिने सोडलं मौन
Follow us on

भारतीय क्रिकेट संघाचा दमदार क्रिकेटपटू शुबमन गिल कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकताच शुबमन गिल आयपीएल 2024 गुजरातसाठी कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसला. कायम आपल्या दमदार खेळीमुळे चर्चेत असणारा शुबमन एका अभिनेत्रीच्या प्रेमात क्लिनबोल्ड झाल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री रिद्धीमा पंडित आणि शुबमन गिल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. दोघे लग्न देखील करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दोघांच्या डेटिंगच्या चर्चा देखील तुफान रंगल्या आहे. दरम्यान यावर अभिनेत्री प्रतिक्रिया दिली आहे.

‘बहू हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्री रिद्धीमा पंडित यंदाच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. यावर खुद्द अभिनेत्रीने मौन सोडलं आहे एका रिपोर्टनुसार, रिद्धीमा , शुबमन याच्यासोबत लग्न करणार आहे. शिवाय त्यांच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रिद्धीमा पंडित आणि शुबमन गिल डिसेंबर 2024 मध्ये लग्न करणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. दोघांना त्यांचं लग्न गुपित ठेवायचं आहे. त्यामुळे यावर अधिकृत माहिती समोर येत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.

 

 

क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत रंगणाऱ्या लग्नाच्या अफवांवर रिद्धीमाने मोठं वक्तव्य केलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘सकाळी उठली तेव्हा पाहिलं अनेकांचे फोन आले होते. प्रत्येक जण मला शुबमनसोबत लग्नाबद्दल विचारत होते. मी लग्न केव्हा आणि कोणासोबत करेल… वेळ आल्यानंतर मी याबद्दल सांगेल… पण सध्या तरी असं काहीही नाही…’ असं म्हणत अभिनेत्री रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत सांगितलं…

 

 

शुबमन गिल – सारा अली खान

शुबमन गिल आणि सारा अली खान यांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले. दरम्यान, दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण असं काहीही नसल्याचा स्वीकार अभिनेत्रीने कपिल शर्मा याच्या शोमध्ये केला होता.

शुबमन गिल – सारा तेंडुलकर

शुबमन गिल – सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सर्वत्र रंगलेल्या असतात. अनेक ठिकाणी शुबमन गिल – सारा तेंडुलकर यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही.