टीव्ही अभिनेत्री रिद्धीमा पंडित तिच्या कामापेक्षा कमी लग्न आणि अफेअरमुळे अधिक चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून रिद्धीमा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिद्धीमाचं नाव कायम भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू शबमन गिल यांच्यासोबत जोडलं जातं. एवढंच नाही तर, दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण एका मुलाखतीत अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. फक्त अफवा आहेत… असं म्हणाली होती. पण आता अभिनेत्री लाईफ पार्टनरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र रिद्धीमा हिची चर्चा रंगली आहे.
एका मुलाखतीत रिद्धीमा म्हणाली होती, डेट किंवा लग्न करण्यासाठी कोणी चांगली व्यक्ती भेटत नाही… ‘मी कायम विचार करायची की, नक्की अडचण काय आहे. मला चांगला पार्टनर का भेटतच नाही. त्यानंतर मी अनुभवलं की चांगलं पुरुषच नाहीत…’
‘एका महिलेसोबत आयुष्यभर राहाण्याचं साहस कोणामध्ये नाही… जी महिला स्वतःचं काम करत आहे. अनेक लोकं स्वतःच्या पायावर भक्कम उभ्या असलेल्या महिलांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यासाठी हे पुरुषत्व नाही. मला अशा पुरुषासोबत राहायचं नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
‘बहू हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्री रिद्धीमा पंडित हिने शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सकाळी उठली तेव्हा पाहिलं अनेकांचे फोन आले होते. प्रत्येक जण मला शुबमनसोबत लग्नाबद्दल विचारत होते. मी लग्न केव्हा आणि कोणासोबत करेल… वेळ आल्यानंतर मी याबद्दल सांगेल… पण सध्या तरी असं काहीही नाही…’ असं म्हणत अभिनेत्री रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत सांगितलं…
रिद्धीमा पंडित एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ‘बहू हमारी रजनीकांत’ मालिकेनंतर अभिनेत्री ‘खतरो के खिलाडी 9’ मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली. त्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये देखली अभिनेत्री स्पर्धक म्हणून झळकली.
रिद्धीमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात