मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यातील ‘तू तू मै मै’ सर्वश्रुत आहे. एकेकाळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर अप्रत्यक्ष पोस्ट लिहित दोघांनी एकमेकांना टोमणे मारले. या दोघांमधील वाद जरी शमला असला तरी जेव्हा कधी उर्वशीला पाहिलं जातं तेव्हा ऋषभचा उल्लेख चाहत्यांकडून आवर्जून केला जातो. सध्या आयपीएल सुरू असल्याने पुन्हा एकदा ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेलाचं नाव चर्चेत आलं आहे.
स्टेडियमवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द उर्वशीने हा फोटो शेअर करत प्रश्न विचारला आहे. काही महिन्यांपूर्वी ऋषभ एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यातून तो हळूहळू बरा होत असतानाच पहिल्यांदाच त्याला सार्वजनिक ठिकाणी पाहिलं गेलं. आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी तो अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचला होता. IPL 2023 मधील गुजरात टायटन्सविरोधातील दिल्ली कॅपिटल्सची ही मॅच सुरू होती.
या मॅचदरम्यान स्टेडियममध्ये एक लडकी मोठा पोस्टर हातात पकडून उभी होती. त्या पोस्टरवर लिहिलं होतं, ‘नशिब उर्वशी इथे नाहीये.’ या मुलीच्या मागे एक तरुण उभा असल्याचं पहायला मिळत आहे. त्याचा चेहरा या फोटोमध्ये दिसत नसला तरी तो ऋषभ असल्याचं म्हटलं जात आहे. पोस्टर घेऊन उभ्या असलेल्या या मुलीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि उर्वशीचीही नजर त्या फोटोवर गेली. त्यानंतर तिने स्वत: तो फोटो शेअर करत प्रश्न विचारला की, ‘का’?
उर्वशीने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘उर्वशी, उर्वशी टेक इट इजी उर्वशी’ असे गाण्याचे बोल एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले. तर दुसऱ्याने म्हटलं, ‘ऋषभ भावाला नजर लागली असती’. पोस्टरवर उर्वशीच्या नावापुढे रौतेला असं आडनाव नव्हतं, त्यामुळे काहींनी तिला दुर्लक्ष करण्याचाही सल्ला दिला आहे.
उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे.
ऋषभच्या अपघातानंतर उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाच्या इमारतीचा फोटो पोस्ट केला होता. त्याच रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू होते.