नवी दिल्ली : बातमीच हेडींग वाचून तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण होतील. हा कुठल्या नोकरीचा विषय नाहीय, तर आम्ही चित्रपटाबद्दल बोलतोय. लोक नोकरीसाठी लाखोने अर्ज करतात. सध्या एका चित्रपटाच्या बाबतीत हे घडतय. एका लोकप्रिय चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल 25 हजार लोकांनी अर्ज केले आहेत. महत्त्वाच म्हणजे हा प्रादेशिक चित्रपट होता. पण नंतर तो बहुभाषिक झाला. देशभरात तुफान हिट ठरला. आता याच चित्रपटात संधी मिळावी, म्हणून अनेकांमध्ये स्पर्धा आहे. आम्ही बोलतोय ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाबद्दल. ‘कांतारा’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.
आता कांताराचा पुढचा भाग ‘कांतारा 2′ बद्दल लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. अलीकडेच होम्बले फिल्म्सने चित्रपटाच्या स्टारकास्ट सिलेक्शनसाठी अर्ज करण्याची संधी दिली होती. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कांतारा 2 च्या स्टारकास्टचा भाग होण्यासाठी तब्बल 25 हजार लोकांनी अर्ज केलाय. ‘कांतारा’ चित्रपट प्रेक्षकांमध्ये किती लोकप्रिय आहे, याच हे एक उत्तम उदहारण आहे. आता 25 हजारपैकी किती लोकांना संधी मिळणार? हे लवकरच ठरेल.
स्टारकास्टचा भाग होण्यासाठी अट काय?
कलाकार पाहिजे म्हणून होम्बले फिल्म्सने एक पोस्ट शेअर केली होती. पुरुष कलाकारांच वय 30 ते 60 वर्षा दरम्यान पाहिजे अशी अट होती. महिला कलाकारासाठी वयाची अट 18 ते 60 होती. kantasara.film वेबसाइटवर जाऊन नाव रजिस्टर कराव लागणार होतं. 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी होती. आतापर्यंत 25 हजार अर्ज आले आहेत.