सोशल मीडियावर सध्या अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या मुलांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रितेश – जिनिलिया यांना मुंबई विनामतळावर त्यांच्या दोन मुलांसोबत स्पॉट करण्यात आलं. कायम संस्कारांमुळे चर्चेत असणारी रितेश – जिनिलिया यांनी मुलं आता त्यांच्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आली आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश – जिनिलिया यांच्या मुलांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
रितेश – जिनिलिया यांच्यासोबत दिसणाऱ्या रियान आणि राहिल यांनी पापाराझींना पाहाताच हात जोडले. ज्यामुळे दोघांचं कायम कौतुक केलं जातं. पण आता त्यांची हेअरस्टाईल चर्चेत आली आहे. रियान आणि राहिल दोघांचे केस लांब आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटटकरी म्हणाला, ‘अशी हेअरस्टाईल कोणत्या शाळेत चालते…’
दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जिनिलियाचा मुलगा एमसी स्टॅन दिसत आहे…’, तर लहान मुलांना लांब केस चांगले दिसत नाहीत. शाळेत कोणी काही बोलत नाही का? असा प्रश्न देखील चाहते उपस्थित करत आहेत. पूर्ण बॉलिवूडमध्ये रियान आणि राहिल संस्कारी आहे. पण त्यांच्या हेअरस्टाईलमुळे संस्कार लपले आहेत… अशा कमेंट करत नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
सांगायचं झालं तर, उद्योजक मुकेश अंबानी – नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत आणि होणारी सून राधिका यांचा दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी जात असताना रितेश – जिनिलिया यांच्यासोबत मुलांना देखील स्पॉट करण्यात आलं. सध्या सर्वत्र देशमुख कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
अनंत – राधिका यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी रितेश – जिनिलिया यांच्यासोबत शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी प्री-वेडिंग फंक्शनसाठी गेले आहेत.
अनंत – राधिका यांच्यादुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनचीमोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. 1 जूनपर्यंत दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन सोहळा रंगणार आहे. आलिशान क्रुझमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.