बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट करताना दिसला. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या गोळीबाराबद्दल कळताच सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी लीलावती रूग्णालयात धाव घेतली. बाबा सिद्दीकी हे कायमच बॉलिवूड कलाकारांच्या जवळ असत. खास पार्टीचे आयोजन त्यांच्याकडून गेले जात. हेच नाही तर सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील वाद देखील त्यांनीच मिटवला होता.
बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारानंतर रितेश देशमुख यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर रितेश हैराण झालाय. आता रितेशची पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय.
रितेश देशमुख याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर मला अत्यंत दु:ख झाले असून मोठा धक्का बसलाय. दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. या अत्यंत कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला धीर मिळो. ज्यांनी कोणी हा गुन्हा केलाय त्यांना कटघऱ्यामध्ये उभे करावे, असे रितेशने म्हटले.
Extremely saddened and shocked beyond words to learn about the tragic demise of Shri #BabaSiddique ji – My heart goes out to @zeeshan_iyc and the entire family- May god give them strength to brave this difficult time. The perpetrators of this horrific crime must be brought to… pic.twitter.com/zjNLnspbrp
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 12, 2024
आता रितेश देशमुख याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. लोक रितेशच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करून बाबा सिद्दीकी यांना श्रद्धाजंली वाहताना दिसत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर बॉलिवूड हादरल्याचे बघायला मिळतंय. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे बघायला मिळतंय.
बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची संपूर्ण जबाबदारी ही बिश्नोई गँगकडून घेण्यात आलीये. तशी एक पोस्ट देखील बिश्नोई गँगकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. हेच नाही तर आपली आणि बाबा सिद्दीकीची कोणतीही दुश्मनी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. सलमान खान आणि दाऊद इब्राहिमच्या जवळ असल्याने हत्या करण्यात आल्याचे बिश्नोई गँगकडून पोस्टमध्ये सांगण्यात आले.