मुंबई : अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार म्हटले जाऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. तसेच, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पोक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार म्हटले जाऊ शकत नाही, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. प्लीज कुणीतरी म्हणा ही फेक न्यूज आहे, एवढ्या बोलक्या शब्दात रितेशने आपली नाराजी व्यक्त केलीय. (Riteish Deshmukh Statement on posco Act Case)
Pls tell me this is Fake news !!! https://t.co/orskyq7mn4
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 24, 2021
जेव्हा लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक होऊ शकतो असं, न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बॉलिवडूमधील तारे-तारकांनी सोशल मीडियावर आपापल्या कमेंट्स नोंदवत कोर्टाच्या या निर्णयावर नाराजी दर्शवलीय. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, शिवानी दांडेकर, रितेश देशमुख यांचा समावेश आहे. प्लीज कुणीतरी म्हणा ही फेक न्यूज आहे, असं बोलकं ट्विट करुन आपल्याला कोर्टाचा निकाल आवडलेला नाही, हे रितेशने सांगितलं आहे.
तापसी पन्नू म्हणते, मी खूप प्रयत्न केला करुनही आता सध्याची माझी फिलिंग काय आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहचवू शकत नाही. माझ्याकडे शब्द नाही किंवा ते फुटत नाही. आणखी एक ट्विट करत हॅप्पी नॅशनल टाईल्ड डे, असं उपरोधिक ट्विट करत तापसीने कोर्टाच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केलीय.
I tried for long but m still left with no words to describe how I feel after reading this. https://t.co/U8BKFrkhu8
— taapsee pannu (@taapsee) January 24, 2021
नागपूरमध्ये 2016 साली घडलेल्या एका खटल्यावेळी कोर्टाने महत्वाचा निकाल दिला. नागपुरात सतीश नावाच्या 39 वर्षीय आरोपीने एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी पीडित मुलीची साक्ष घेऊन पॉक्सो कायद्याअंतर्गत सतीशला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या खटल्यात सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आरोपी सतीशने मुलीला घरी नेऊन छातीला पकडून निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात सतीशने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करून आज यासंदर्शातील महत्वाचं निरीक्षण नोंदवले.
अभिनेत्री शिवानी दांडेकरनेही कोर्टाच्या निर्णयावर असहमती दर्शवली आहे. तिलाही वैयक्तिकरित्या न्यायालयाचा हा निर्णय आवडलेला नाहीय.
नेमका खटला काय?
नागपूरमध्ये 2016 रोजी 39 वर्षीय सतीश नावाचा आरोपी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला सामान देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला. यावेळी आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सतीशवर होता. या खटल्यात सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आरोपी सतीशने मुलीला घरी नेऊन छातीला पकडून निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर फिर्यादी पक्ष आणि पीडित मुलीच्या साक्षीचा आधार घेत आरोपी सतीशला पोक्सो कायद्यांतर्गत 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, या निकालावर आक्षेप घेत आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. त्यानंतर सत्र न्यायालयाच्या याच निर्णयामध्ये संशोधन करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पिठाने आरोपीच्या शिक्षेत कपात करत त्याला 3 वर्षांवरून 1 वर्षाची शिक्षा सुनावली.
कोर्ट काय म्हणाले?
सत्र न्यायालयाने पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावल्यानंतर या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी घेण्यात आली. यावेळी आरोपीने मुलीचे कपडे न काढता तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने मांडला. तसेच, ‘कपडे न काढता स्पर्श करण्याचे कृत्य हे लैंगिक अत्याचाराच्या परिभाषेत येत नाही. अशा प्रकारचे कृत्य हे आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत महिलांच्या चरित्र्य हननाचा गुन्हा अशू शकतो. त्यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यांत आरोपीला कमीतमी 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते,’ असे न्यायलय म्हणाले. त्यानंतर आरोपीला पोक्सो अंतर्गत दिलेल्या शिक्षेतून मुक्त करत त्याला एका वर्षाची शिक्षा उच्च न्यायलयाने ठोठावली.
दरम्यान, न्यायलयाच्या या निर्णयामुळे आरोपीची तीन वर्षांची शिक्षा कमी झाली असून त्याला आता आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत कारावासाला सोमोरे जावे लागेल.
संबंधित बातम्या :
(Riteish Deshmukh Statement on posco Act Case)