Genelia Deshmukh Net Worth: महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देखमुख आणि अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जिनिलीया देशमुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच असते. जिनिलीया तिच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. जिनिलीया हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण बॉलिवूडमध्ये जिनिलीय हवी तशी प्रसिद्धी मिळवू शकली नाही.
जिनिलीया हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. तेव्हापासून दोघांच्या ‘लव्हस्टोरी’ला सुरुवात झाली. त्यानंतर 2012 मध्ये जिनिलीया आणि रितेश यांनी लग्न केलं.
आता जिनिलीया अभिनय क्षेत्रात फारशी सक्रिय नाही. पण असं असताना देखील जिनिलीया कुटुंबासोबत रॉयल आणि आलिशान आयुष्य जगते. रिपोर्टनुसार, जिनिलीयाच्या संपत्तीचा आकडा तब्बल 6 मिलियन डॉलर आहे. जिनिलीया अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, व्यवसाय, सिनेमे, ब्रँड प्रमोशन अन्य मार्गांनी कोट्यवधींची कमाई करते.
एवढंच नाही तर, जिनिलीया आणि रितेश यांचं स्वतःचं प्रॉडक्श हाऊस देखील आहे. ‘मुंबई फिल्मी कंपनी’ असं दोघांच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत आतापर्यंत 3 सिनेमांची निर्मिती झाली आहे. शिवाय दोघांची प्लांट बेस्ट कंपनी देखील आहे. या कंपनीचं नाव ‘इमॅजीन मीट्स’ असं आहे.
जिनिलीया हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. जिनिलीया हिच्याकडे टेस्ला मॉडेल एक्स एसयूव्ही आणि मर्सिडीज बेंझ एस डब्ल्यू 221 देखील आहे. अनेक ठिकाणी जिनिलीया आणि रितेश यांना एकत्र स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर देखील दोघे कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय रितेश आणि जिनिलीया कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.