सोलापूर : अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आपल्या अभिनयासोबतच त्याच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा (Vilasrao Deshmukh) मुलगा ते बॉलिवूडमधील एक यशस्वी आणि सुप्रसिद्ध अभिनेता अशी स्वत:ची ओळख रितेश देशमुखने निर्माण केली आहे. रितेश देशमुखच्या हस्ते आज सोलापुरात माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या वॉटर पार्कचं (Water Park) उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना रितेशने चालू परिस्थितीवर महत्वाचं वक्तव्य केलंय. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा होत्या. मात्र आता इंटरनेट ही देखील एक गरज बनली आहे. इंटरनेट म्हणजेच मनोरंजन असंही रितेश म्हणाला.
वॉटर पार्कच्या उद्घाटनावेळी रितेशने सोलापूरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. रितेश म्हणाला की, सोलापूर आणि माझे जुने नाते आहे. लातूरला ट्रेन नसायची तेव्हा आम्ही सोलापूरला यायचो. लातूर ते मुंबई हा प्रवास नेहमी व्हाया सोलापूर झालेला आहे. सोलापूर हे माझ्यासाठी आपुलकीचे शहर आहे. सोलापूर स्टेशनवर आम्ही जेवण करुन पुढचा प्रवास करायचो, अशी आठवणही रितेशने यावेळी सांगितली. दरम्यान, कार्यक्रमाच्या ठिकाणी रितेशला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुण-तरुणींनी मोठी गर्दी केली होती.
रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा अनेकदा त्यांचं प्रेम, भांडणं आणि आयुष्यातील कडू-गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात, महत्त्वाचं म्हणजे हे सगळं त्यांच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरतं. दोघंही 2012 पासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. दोघांनाही रुपेरी पडद्यावर बऱ्याच दिवसांपासून पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसू दिसणार आहे. हो जेनेलियाने स्वतः हा खुलासा केला आहे.
रितेश आणि जिनिलिया यांनी काही दिवसांपूर्वी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली होती. या जोडप्यानं सेटवर त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल प्रेक्षकांना सांगितलं, दोघं कसे जवळ आले? दोघांनी त्यांच्या लग्नाचे आणि आयुष्यातील मनोरंजक किस्से सांगितले. या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी एन्जॉय केली. यामुळे रितेश आणि जिनिलियाला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता पुन्हा वाढली. स्पॉटबॉयच्या बातमीनुसार, जिनिलियाला विचारण्यात आलं की, ‘प्रेक्षक तुमच्या दोघांना एकत्र पडद्यावर कधी पाहू शकतील’. यावर जिनिलिया म्हणाली, ‘मला आशा आहे की हे लवकरच होईल. हे या वर्षाच्या अखेरीस घडू शकतं.” याआधी जिनिलियाने एकदा सांगितलं होतं की तिला स्वतः रितेशसोबत काम करायचं आहे आणि फक्त एका चांगल्या स्टोरीची वाट पाहत आहे.