मुंबई : केवळ छंद किंवा हौस म्हणून काम करणारे आणि त्या हौसचे संधीत रूपांतर करणारे फार क्वचित असतात. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आवड आणि जिद्द या बळावर कार्यकारी निर्माता ते निर्माता असा आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू करणारे रोहन गोडांबे यांची गोष्ट ही चित्रपटातल्या नायकासारखी आहे.
‘अपनी तकलीफ को यह बताओ की तुम्हारा हौसला कितना बड़ा है’ ! या उक्तीनुसार शालेय जीवनापासून कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या गुरुतुल्य व्यक्तींच्या सानिध्यात कलेचे धड़े गिरवत आपला प्रवास करणाऱ्या रोहन यांना अभिनयापेक्षा बॅकस्टेज सांभाळण्याची कसरत अधिक आवडू लागली. रोहन गोडांबे यांनी आपली क्षमता, आपले प्रयत्न ह्यांतून आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू केला.
२२ वर्षात कला क्षेत्रात काम
लाइन प्रोडयुसर, कार्यकारी निर्माता ते निर्माता हा त्यांचा प्रवास थकक करणारा आहे. २२ वर्षे इंडस्ट्रीत प्रचंड काम केल्यानंतर आलेल्या अनुभवातून त्यांनी स्वत:च्या ‘असमथी प्रोडक्शन्स’ या निर्मीती संस्थेअंतर्गत काही वेबसिरीज आणि मराठी चित्रपटांच्या निर्मीतीची धुरा उचलली आहे. लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येइल. चित्रपटसृष्टीत तसा कोणताही गॉडफादर नसताना रोहन गोडांबे यांनी आपल्या मार्गदर्शकांची साथ, घरच्यांचा पाठींबा आणि जिद्दीच्या जोरावर चित्रपटनिर्मितीच्या स्वप्नाची मजल गाठली आहे.
अत्तापर्यंत केलेले काम
‘उत्तरायण’ ‘एवढंस आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक ‘पालक’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘यलो’, ’न्यूड’, ‘डोक्याला शॉट’, विकून टाक, अलीकडचा ‘बीटरस्वीट’ या दर्जेदार मराठी चित्रपटांसोबत झोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट’ आंतरराष्ट्रीय फिल्म ‘नोरा’ यासारख्या चित्रपटांच्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
Armaan Kohli | अभिनेता अरमान कोहलीला मोठा धक्का, ड्रग्ज प्रकरणात जामीन देण्यास न्यायालयाचा नकार!
Bigg Boss Marathi 3 | सोनाली पाटीलनंतर ‘बिग बॉस मराठी’तून आणखी एका स्पर्धकाचे एलिमिनेशन