मुंबई : नेहा कक्करनं (Neha Kakkar) बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या प्रत्येक दुसऱ्या चित्रपटात नेहाचं गाणं ऐकायला मिळतं. तिच्या गाण्यांना चाहत्यांचीही खूप पसंती मिळते. आपल्या आवाजानं भुरळ पाडणाऱ्या नेहा कक्करचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोशल मीडियावर पती रोहनप्रीत सिंगनं (Rohanpreet Singh) नेहाला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑक्टोबर 2020 मध्ये नेहानं पंजाबी गायक रोहनप्रीतशी लग्न केलं. लग्नानंतर रोहन आणि नेहा अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करुन एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. अशा परिस्थितीत आता नेहाचा आज वाढदिवस असल्याने नवऱ्यानं पत्नीला रोमँटिक फोटोसोबत अप्रतिम कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा खास पोस्ट
रोहनप्रीतनं दिल्या शुभेच्छा
रोहननं एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये नेहा पतीला मिठी मारताना दिसतेय. सोबतच रोहननं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की ‘अरे माझ्या प्रेमाची माझी राणी नेहा कक्कडर, आज तुझा वाढदिवस आहे… मला तुला सांगायचं आहे की मी आतापर्यंत तुझी जेवढी काळजी घेतली त्यापेक्षा जास्त काळजी घेईन… तू मला प्रत्येकदृष्टीनं प्रेमळ वाटते. मी तुला वचन देतो की मी तुम्हाला प्रत्येक आनंद देईन…’
रोहननं पुढं लिहिलं की ‘तुझा पती होण्याचा मला सन्मान वाटतो, मी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्यावर प्रेम करण्याचं वचन देतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जेव्हा तू हे वाचशील तेव्हा हसत राहशील अशी आशा आहे, जेव्हा तू माझ्याकडे असते तेव्हा नेहमीच आशीर्वाद मिळतो. तू सदैव माझी आहेस… देवा तुला आशीर्वाद देईल नेहू माझी राणी…’
रोहनची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत आहेत.
संबंधित बातम्या
OTT Movies : जूनमध्ये ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित
Photo : बँकेत नोकरी करुन 4000 रुपये कमवायचा, आता कर्तृत्वाने घराघरात मिळालीय बाघाला ओळख
Yami Gautam : लग्नानंतर यामी गौतमचा पहिला फोटो आला समोर, या लूकमध्ये दिसली प्रचंड सुंदर