Bigg Boss 16: शिव ठाकरे याचं चमकलं नशीब; फिनालेपूर्वीच त्याच्याकडे मोठी ऑफर

| Updated on: Feb 11, 2023 | 10:18 AM

लवकरच चाहत्यांना आणि बिग बॉसला त्यांच्या बिग बॉस १६ चा विजेता भेटणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी बिग बॉसचा विजेता सर्वांसमोर येणार आहे... पण त्याआधी शिव 'या' कारणांमुळे चर्चेत...

Bigg Boss 16: शिव ठाकरे याचं चमकलं नशीब; फिनालेपूर्वीच त्याच्याकडे मोठी ऑफर
Shiv Thakare
Image Credit source: Instagram
Follow us on

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’ च्या घरात फिनाले विकला सुरूवात झाली आहे. लवकरच चाहत्यांना आणि बिग बॉसला त्यांच्या बिग बॉस १६ चा विजेता भेटणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी बिग बॉसचा विजेता सर्वांसमोर येणार आहे. पण बिग बॉस फिनालेपूर्वीच अनेक स्पर्धकांना मोठी ऑफर मिळाली आहे. अशात शिव ठाकरे (shiv thakare) याच्यासाठी देखील बिग बॉसचं घर लकी ठरलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बिग बॉसनंतर शिव ठाकरे रोहित शेट्टी यांच्या खतरो के खिलाडी १३ मध्ये झळकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिग बॉसनंतर शिव ठाकरे यांनी नशीब चमकणार आहे. (bigg boss 16 today full episode youtube)

शिव ठाकरे बिग बॉसच्या दमदार स्पर्धकांपैकी एक आहे. बिग बॉस शोमधून बाहेर येण्यापूर्वी रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांनी शिव याला मोठी ऑफर दिली आहे. खरं सांगायचं झालं म्हणजे, फिनालेपूर्वी रोहित शेट्टी बिग बॉसच्या घरात आले होते. तेव्हा त्यांनी स्पर्धकांकडून भयानक टास्क करून घेतले.

 

 

रोहित शेट्टी यांनी टास्कनंतर काही स्पर्धकांची निवड ‘खतरो के खिलाडी १३ ‘ (Khatron Ke Khiladi 13) साठी केली आहे. रोहित शेट्टी यांनी शिव ठाकरे, अर्चना गौतम, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी आणि शालीन भनोट यांना टास्क दिले. तुमच्यापैकी एखाद्याची एन्ट्री ‘खतरो के खिलाडी १३ ‘ मध्ये होईल असं देखील रोहित शेट्टी म्हणाले.

बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांना कठीण टास्क दिल्यानंतर रोहित शेट्टी यांनी शिव ठाकरे यांची ‘खतरो के खिलाडी १३ ‘ साठी निवड केली आहे. ‘खतरो के खिलाडी १३ ‘ च्या यादीमध्ये अर्चना गौतम हिचं नाव देखील असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता बिग बॉस १६ च्या फिनालेमध्ये रोहित शेट्टी स्पर्धकांच्या नावांची घोषणा करणार आहेत. त्यामुळे आता सर्वत्र शिव ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे. (Bigg Boss 16 Finale)

दरम्यान, शिव ठाकरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द बिग बॉस यांनी शिव ठाकरे याचं कौतुक केलं आहे. ज्यामुळे शिव प्रचंड भावुक झाला आणि ‘बिग बॉस तुम्ही सिनेमाच तयार केला आणि मला हिरो केलं.’ आनंदामध्ये शिवने अनेकदा मंचावर डोक टेकवत आभार मानले. बिग बॉस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे तू दाखवून दिलं आहेस. असं देखील बिग बॉस म्हणाले. (shiv thakare instagram)