मुंबई : बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत द्रौपदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपा गंगुली (Roopa Ganguly) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा रुपा गंगुली बॉयफ्रेंडसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. एका मुलाखतीत खुद्द रुपा गंगुली यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र रुपा गंगुली यांचीच चर्चा रंगत आहे. ‘महाभारत’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर रुपा गंगुली एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आल्या. मालिकेत साकारलेल्या द्रौपदी भूमिकेनंतर अभिनेत्रीचं भाग्य चमकलं. अनेक सिनेमांच्या ऑफर देखील अभिनेत्रीला येवू लागल्या. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्थी यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत रुपा गंगुली यांनी स्क्रिन शेअर केली.
रुपा गंगुली यांना प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण खासगी आयुष्यात मात्र रुपा गांगुली यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, अनेक गोष्टींना कंटाळून त्यांनी स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला. 1992 मध्ये रुपा गांगुलीचे ध्रुब मुखर्जीशी लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही एक मुलगा असून, त्याचे नाव आकाश आहे.
रिपोर्टनुसार, रूपाने ध्रुबसाठी आपली कारकीर्ददेखील पणाला लावली होती. एक काळ असा होता की त्यांना खर्चासाठी पतीकडून पैसेदेखील मिळत नव्हते. यामुळे दोघांमध्ये बरीच भांडणे झाली. यामुळे नैराश्य आलेल्या रूपा यांनी तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्नही केला होता.
ध्रुब मुखर्जी आणि रुपा गांगुली यांनी २००९ साली घटस्फोट घेतला. घटस्फोटनंतर देखील त्यांच्या खासगी आयुष्याची तुफान चर्चा रंगली. पतीसोबत सतत वाद होत असताना रुपा यांच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली.
रूपा यांनी ‘सच का सामना’ या रिअॅलिटी शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केला होता. विवाहित असूनही तिचे दुसर्या कोणाशी संबंध असल्याशी कबुली दिली होती. त्यांनी सांगितले की, महाभारत शो करत असताना, को-स्टारबरोबर त्यांचे अफेअर सुरू होते. रुपा यांच्या बॉयफ्रेंडचं नाव प्रेमी दिब्येंद्र असं होतं. पण त्यांचं नांतं देखील अधिक काळ टिकू शकलं नाही.
रूपा गांगुली यांनी चित्रपटांतून ‘अभिनेत्री’ म्हणून जितकी प्रसिद्धी कमावली तितकेच नाव आणि प्रेम ‘राजकारणा’तूनही मिळवले. रूपा गांगुलीने फक्त हिंदी आणि बंगाली चित्रपटातूनच काम केले नाही तर, तिने दूरदर्शनवरही काम केले आहे.