मुंबई : ऑस्कर पुरस्कार हा कलाकारांसाठी मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. ऑस्कर पुरस्कारावर स्वतःचं नावं कोरणं आणि ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सामिल होणं फार मोठी गोष्ट आहे. अशात एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर जगभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पण तुम्हाला माहिती आहे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सामिल होण्यासाठी ‘आरआरआर’ सिनेमाच्या टीमला मोठी रक्कम मोजावी लागली आहे.
‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळणार असल्यामुळे ‘आरआरआर’ सिनेमाच्या टीमला सोहळ्यात फ्री प्रवेश असेल? असं अनेकांना वाटलं असेल.. पण असं नाहीये.. Oscars 2023 मध्ये राजामौली, रामचरण आणि ज्यूनियर NTR यांच्यासोबत अनेकांना फ्री एन्ट्री नव्हती. तर आज जाणून घेवू Oscars पुरस्कार सोहळ्यात एक सीट रिझर्व्ह करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात.
मिळालेल्या माहितीनुसार, म्यूझिक कम्पोजर एमएम केरावनी आणि गीतकार चंद्र बोस यांच्याकडे Oscars पुरस्कार सोहळ्यासाठी फ्री पास होते. पण पुरस्कार सोहळ्यात एसएस राजामौली, ज्यूनियर एनटीआर, राम चरण आणि त्यांचे काही कुटुंबिय देखील सामिल झाले होते. यासर्वांनी Oscars पुरस्कार सोहळ्यासाठी पास खरेदी केले होते.
रिपोर्टनुसार, Oscars पुरस्कार सोहळ्याच्या एक तिकिटाची किंमत भारतील चलनानुसार जवळपास २०.६ लाख रुपये असते. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्करमध्ये फक्त विजेत्याला आणि त्याच्या कुटुंबासाठी पास दिले जातात. तर इतरांना तिकीट खरेदी करावं लागतं. मात्र, काही चाहत्यांनी असेही सांगितले की, तिकीट खरेदी करूनही आरआरआर सीनेमाच्या टीमला शेवटच्या रांगेत जागा देण्यात आली.
RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याने जगभरात प्रत्येकाला वेड लावलं आहे. जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू मंचावर सादर करण्यात आलं तेव्हा त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सांगायचं झालं तर, दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी कमाई केली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने नवीन विक्रम रचला. रिपोर्टनुसार, ‘आरआरआर’ सिनेमाला यश मिळाल्यानंतर एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ सिनेमाच्या सिक्वलवर काम करण्यास सुरुवात केली आहे.