मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | बिग बॉसची माजी विजेती आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या तिच्या काही ट्विट्समुळे चर्चेत आली आहे. दिवाळीत होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा ठरला आहे. त्यातच रुबिनाने दिवाळीबद्दल एक ट्विट केलं. ज्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘ज्यांच्याशी संबंधित असेल त्यांच्यासाठी.. दिवाळी संपली आहे, कृपया फटाके फोडणं बंद करा’, असं तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटलंय. फटाक्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे रात्रभर झोप नसल्याचीही तक्रार तिने केली आहे.
रुबिनाने लिहिलं, ’10 नोव्हेंबरपासून पहाटे 3 वाजेपर्यंत अविरत फटाके फोडले जात आहेत. आता थांबवा हे सगळं. वायू प्रदूषण तर आहेच, पण ध्वनी प्रदूषणामुळे आमची झोपमोड होतेय.’ या ट्विटनंतर काही वेळाने तिने काही स्क्रीनशॉट्स पोस्ट केले. ज्यामध्ये नेटकऱ्यांनी तिला तिची पोस्ट डिलिट करण्यास सांगितलं. ‘दिवाळीच्या दिवशी तू केलेलं हिंदूविरोधी प्रचारकी ट्विट लगेच डिलिट कर. अन्यथा आम्ही तुझ्याविरोधात निषेधाची मोहीम सुरू करू’, असं त्यात लिहिलं होतं. काहींनी तिला एसी, महागडे आलिशान कार न वापरण्याचा सल्ला दिला.
Diwali, is a festival of lights , celebration of Shree Ram returning to Ayodhya !Well, Ramayan mein bursting crackers for 10days was never mentioned , So all you Pseudo Hindu propaganda agents , Go and find someone ELSE to highlight your paid accounts and fake ids! Dare NoT✋🏼🛑 https://t.co/QJakYtN4ZE
— Rubina Dilaik (@RubiDilaik) November 15, 2023
या सर्व ट्रोलिंगनंतर वैतागलेल्या रुबिनाने सवाल केला, ‘हिंदूविरोधी? तुमचं डोकं खरंच ठिकाणावर आहे का? माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट करायला येऊ नका. हे ज्ञान नाही, मिस्टर अतिहुशार मूर्ख विपुल श्रीसथ. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही सण-उत्सव साजरे करतो, पण दुसऱ्यांना त्रास देत नाही.’ रुबिना इथेच थांबली नाही. तर तिने दिवाळी सणाचा नेमका अर्थसुद्धा नेटकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला.
Anti Hindu ??? Are you guys SERIOUSLY OUT OF YOUR MIND 🙄 pic.twitter.com/5Rqp9cHiRh
— Rubina Dilaik (@RubiDilaik) November 15, 2023
‘दिवाळी, प्रकाशाचा सण, श्रीराम अयोध्येत परतल्याचा जल्लोष. रामायणात 10 दिवस फटाके फोडण्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे स्वत:ला हिंदू प्रचारक म्हणणाऱ्यांनो, तुमचे बनावट आयडी आणि पेड अकाऊंट्सकडे लक्ष वेधण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी शोधा. माझ्यावर टीका करण्याची हिंमत करू नका’, अशा शब्दांत रुबिनाने ट्रोलर्सना फटकारलं.