मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (chakankar) यांचा मुलगा अभिनेता सोहम चाकणकर (soham chakankar) याचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नुकताच सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. ज्यामुळे सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात शिगेला पोहचली आहे. सध्या सर्वत्र सोहम चाकणकर याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे. सोहम चाकणकर स्टारर ‘विरजण’ (virajan) सिनेमात अभिनेत्री शिल्पा ठाकरे ही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सोहम आणि शिल्पा पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे सोहम आणि शिल्पा यांची जोडी प्रेक्षकांना आवडेल का? हे कोडं सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. (soham chakankar mother rupali chakankar)
सोहम – शिल्पा स्टारर ‘विरजण’ सिनेमाची कथा प्रेम कहाणी भोवती फिरताना दिसणार आहे. प्रेम ही भावना आहे आणि ती कधीही दुखावली जाऊ शकते हे सांगणारी एक अनोखी कहाणी ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘विरजण’ या चित्रपटातून सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. (virajan new film)
प्रेम हा शब्द ऐकालया फार छोटा असला तरी, त्यामागे अर्थ फार मोठा आहे. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या चित्रपटातून अभिनेता सोहम चाकणकर आणि अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांची फ्रेशजोडी करून देणार आहे. त्यामुळे तरुणांसोबत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी ‘विरजण’ एक खास अनुभव देणारा सिनेमा ठरणार आहे.
‘विरजण’ सिनेमातील ‘देवा’ गाणं सध्या चर्चेत आहे. ‘देवा’ हे गाणं तेलुगू गायिका सत्यावथी मंगली हिच्या आवाजाच स्वरबद्ध करण्यात आलं आहे. ‘देवा’ या गाण्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मंगली गायन क्षेत्रात नवीन आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरली आहे. ‘तू आणि मी, मी आणि तू’ हे नाव असलेला चित्रपट आता ‘विरजण’ या नावाने प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
सिनेमाच्या नावाप्रमाणेच सिनेमाची कथा कुठे विरजण घालणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर सिनेमातील गाण्यांनी ही उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे. सिनेमा प्रेम कहाणीवर आधारलेला असल्यामुळे सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.