Naal 2 : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा स्पर्धक जयेश खरेला नागराज मंजुळेंकडून मोठी संधी

| Updated on: Oct 30, 2023 | 2:03 PM

नागराज मंजुळे हे त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच नवोदितांना संधी देतात आणि हे कलाकार या संधीचं सोनं करताना दिसतात. असाच हिरा ए. व्ही प्रफुल्लाचंद्रा, नागराज मंजुळे आणि सुधाकर यंकट्टी यांना जयेश खरेच्या रूपात सापडला आहे.

Naal 2 : सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचा स्पर्धक जयेश खरेला नागराज मंजुळेंकडून मोठी संधी
Jayesh Khare's song in Naal 2
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | ‘नाळ’ या चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच ‘नाळ 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ 2’ची निर्मिती नागराज मंजुळे करत आहे. या चित्रपटातील एकेक गाणी प्रदर्शित केली जात आहेत. या गाण्यांसाठी नागराज मंजुळेंनी काही नव्या आवाजांना संधी दिली आहे. याआधील ‘नाळ 2’मधील ‘भिंगोरी’ हे गाणं लोकगायिका कडुबाई खरात यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. त्यानंतर आता चित्रपटातील ‘डराव डराव’ या गाण्यासाठी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा स्पर्धक जयेश खरेला संधी देण्यात आली आहे.

‘डराव डराव’ हे गाणं बच्चे कंपनीवर चित्रित करण्यात आलं असून ते मोठ्यांनाही आवडेल असं आहे. चैतू, चिमू आणि मणी यांची धमाल असलेल्या या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. तर या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी संगीत दिलं आहे. या जबरदस्त गाण्याला जयेश खरे आणि मास्टर अवन यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी ‘नाळ’ या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता ‘नाळ भाग 2’मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला लाभलेला नवोदित गायकाचा आवाज. या गाण्यात विशेष लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे चिमुकली चिमू. एवढीशी गोड मुलगी तिच्या भावंडांसोबत धमाल करत आहे. तिच्यातील हा गोडवा, निरागसता भावणारी आहे.

पहा गाणं

हे सुद्धा वाचा

 

“आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्यात कला दडलेली असते. बऱ्याचदा ती आपल्या नजरेत येत नाही. त्यामुळे मी अशा कलाकारांना नेहमीच संधी देतो. त्यांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे आजवर माझी ही निवड नेहमीच योग्य ठरली आहे. अर्थात हे त्या कलाकारांचे यश. जयेश खरे त्यातलाच एक कलाकार. जयेशच्या आवाजात जादू आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याच्या या जादुई आवाजाने या गाण्यातूनही भावना व्यक्त होत आहेत,” अशी प्रतिक्रिया नागराज मंजुळे यांनी दिली आहे. ‘नाळ 2’ हा चित्रपट येत्या दिवाळीत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.