जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीसोबत अफेअर, दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला अभिनेता, पत्नी फक्त 21 वर्षांची

| Updated on: Feb 19, 2024 | 11:39 AM

Sahil Khan Marriage : वयाच्या 47 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने 21 वर्षांच्या मुलीसोबत उरकलं लग्न, जॉकी श्रॉफ यांच्या पत्नीसोबत असलेल्या संबंधांमुळे आला होता चर्चेत... व्हिडीओ पोस्ट करत दिली दुसऱ्या लग्नाची माहिती

जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीसोबत अफेअर, दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला अभिनेता, पत्नी फक्त 21 वर्षांची
Follow us on

मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांचं नाव अभिनेता साहिल खान याच्यासोबत काही वर्षांपूर्वी जोडण्यात आलं होते. आयेश आणि साहिल यांनी एकत्र व्यवसाय देखील सुरु केल्याची माहिती समोर आली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे दोघांची भांडणं पोलिसांपर्यंत पोहोचली. आता साहिल त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. साहिल याने एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना दुसऱ्या पत्नीची ओळख करुन दिली आहे.

साहिल खान याने वयाच्या 47 व्या वर्षी 21 वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं आहे. साहिल याने पत्नीसोबत सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साहिल खान याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

साहिल खान याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता होडीत बसलेला दिसत आहे. अभिनेत्यासोबत एक महिला देखील दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘याठिकाणी मी आहे आणि ही माझी पत्नी आहे…’ शिवाय व्हिडीओमध्ये अभिनेता ‘माझी पत्नी…’ असं बोलताना देखील दिसत आहे.

रिपोर्टनुसार, साहिल 47 वर्षांचा आहे. तर अभिनेत्याची पत्नी 21 वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. पण अभिनेत्याच्या पत्नीच्या वयाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावर सर्वत्र साहिल खान आणि त्याच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत.

साहिल खान याचं पहिलं लग्न

साहिल खान याचं पहिलं लग्न 2003 मध्ये निगार खान हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्याने 2005 मध्ये पहिल्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2005 मध्ये निगार आणि साहिल यांचा घटस्फोट झाला.

सांगायचं झालं तर, साहिल खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर अभिनेता कायम सक्रिय असतो. अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.