मुंबई | अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका खास कारणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेत्री तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र सई आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. सई ताम्हणकर गेल्या काही दिवसांपासून निर्माता अनिश जोग याला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. दोघे कायम एकमेकांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर दिलेला नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे सई आणि अनिश एकत्र सुट्ट्यांचा आनंद लुटत असल्याचा आनंद वर्तवण्यात येत आहे.
सईने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सई स्पेनमध्ये एकटीच फिरायला गेल्याचं तिच्या फोटोंवरून वाटत होतं, पण सई परदेशात एकटी नाही तर अनिश याच्यासोबत फिरत आहे असं चित्र दिसत आहे. काही फोटोंमुळे सई आणि अनिश एकत्र फिरत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सई आणि अनिश यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एकसारखे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे दोघे एकत्र असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सई गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीमुळे चर्चेत आली आहे. सईने अनेकदा अनिशसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. पण आता सई अनिश याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली कधी देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘मीमी’, ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’ अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमात वेग-वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर करणारी अभनेत्री सई ताम्हणकर कायम तिच्या सिनेमांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण आता आपल्या घायाळ अदांनी चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारी सई तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अनिश जोग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो एक चित्रपट निर्माता आहे. अनिश याने आतापर्यंत ‘टाईमप्लीज’, ‘व्हायझेड’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’ या सिनेमांची निर्मिती केली आहे. सई आणि अनिश एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. शिवाय दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.
सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील सईच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सईने फक्त मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे.