बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आजच्या घडीची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. साराला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. सारा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सारा सावत्र आई आणि अभिनेत्री करीना कपूर हिच्याबद्दल देखील अनेकदा बोलताना दिसते. शिवाय सावत्र भाऊ तैमूर अली खान आणि जेह अली खान यांच्यासोबत देखील सारा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सांगायचं झालं तर, सैफच्या दुसऱ्या लग्नात सारा आण इब्राहिम देखील उपस्थित होते. अशात करीना हिचं सावत्र मुलांसोबत कसं नातं आहे… यावर देखील अनेक चर्चा रंगलेल्या असतात.
पण आता सारा आणि करीना यांच्या नात्याबद्दल नाही तर, त्यांच्या वयातील अंतराबद्दल चर्चा रंगली आहे. सारा आणि सावत्र आई करीना यांच्यामध्ये 15 वर्षांचं अंतर आहे. सारा तिची सावत्र करीना हिच्यापेक्षा 15 वर्ष लहान आहे. करीना हिचा जन्म 12 सप्टेंबर 1980 मध्ये झाला आहे. तर सारा हिचा जन्म 12 ऑगस्ट 1995 मध्ये झाला. वयात 15 वर्षांचं अंतर असलं तरी दोघांमध्ये मैत्रीणीसारखं नातं आहे.
दरम्यान, साराने एका चॅट शोमध्ये सांगितलं होती की, वडील सैफ याने देखील करीना हिला छोटी आई किंवा आई म्हणून बोलावं यासाठी दबाव टाकला नाही. सारा म्हणाली होती, ‘मी करीना कधी के तर कधी करीना म्हणून बोलावते… आमच्या दोघींमध्ये खास मैत्रीणीसारखं नातं आहे. जेव्हा मी करीना भेटली तेव्हा ती मला म्हणाली, ‘मला तुझी आई प्रचंड आवडते… मला असं वाटतं आपल्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असावे…’ सारा कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
नुकताच सारा हिचा वाढदिवस झाला. करीना हिने देखील सावत्र लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. करीना सारा आणि सैफ यांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये करीना म्हणाली, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग सारा. खूप सारं प्रेम आणि भोपळ्याची भाजी तुझ्यासाठी पाठवत आहे.’ करीनाची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.
सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा स्वभाव देखील लोकांना प्रचंड आवडतो. सारा कायम चाहत्यांसोबत गप्पा मारताना आणि फोटो क्लिक करताना दिसते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सारा कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.