करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर हिने अभिनेता शाहिद कपूर याला अनेक वर्षे डेट केले. हेच नाही तर करीना कपूर खान आणि शाहिद कपूर याच्या लग्नाच्या देखील जोरदार चर्चा या रंगताना दिसल्या होत्या. मात्र, करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांचे ब्रेकअप अचानक झाले. हेच नाही तर करीना कपूर खान हिच्या आईला शाहिद कपूर हा आवडत नसल्याचे देखील सांगितले जाते. त्यानंतर करीना कपूर हिने सैफ अली खान याला डेट करण्यात सुरूवात केली. अनेक वर्षे डेट केल्यानंतर सैफ अली खान याच्यासोबत 16 ऑक्टोबर 2012 रोजी करीनाने लग्न केले.
बऱ्याच वर्षांपूर्वीच सैफ अली खान याने करीनाच्या नावाचा एक टॅटू काढला होता. आपल्या हातावर सैफने करीनाच्या नावाचा टॅटू काढला होता. मात्र, आता नुकताच व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सैफ अली खान याने करीनाच्या नावाचा टॅटू काढून टाकल्याचे दिसतंय. हेच नाही तर करीनाच्या नावाऐवजी तिथे आता वेगळाच टॅटू दिसत आहे. यामुळे लोक हैराण झालेत.
अचानकपणे सैफ अली खान याने करीनाच्या नावाचा टॅटू हातावरून काढल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. हेच नाही तर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, चित्रपटासाठी त्याने तो टॅटू कव्हर करून घेतलाय. अजूनही एकाने म्हटले की, बहुतेक यांच्यामध्ये वाद झाला वाटतं, त्यामुळे सैफने करीनाच्या नावाचा टॅटू काढून टाकला.
नेहमीच करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे एकमेकांसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर ही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत विदेशात धमाल करताना दिसली. यावेळी फोटोमध्ये तैमूर अली खान, जेह, सैफ अली खान आणि करीना कपूर हे दिसले होते.
करीना कपूर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. करीना कपूर हिने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या मुख्य या केल्या आहेत. करीना कपूर ही जाहिरातीमधूनही मोठी कमाई करते. विशेष बाब म्हणजे करीना कपूर हिने तिच्या दोन्ही प्रेग्नंसीमध्ये काम केले. करीना कपूर ही गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देताना देखील दिसत आहे.