अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इब्राहिम बाहेर निघताना दिसत आहे. बाहेर येत असताना त्याचा पाय चुकीच्या ठिकाणी पडतो आणि इब्राहिम पडण्यापासून स्वतःला वाचवतो. तेव्हा इब्राहिम त्याठिकाणी असलेल्या पापापाझींना ‘सॉरी सॉरी’ म्हणतो आणि कारमध्ये बसतो…
सध्या इब्राहिम याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘इब्राहिम ठिक असेल अशी आशा करतो…’ तर अनेक जण इब्राहिम नशेत आहे… असं म्हणत आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नशेत आहे तो…’ सर्वत्र इब्राहिम याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
इब्राहिम अली खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, इब्राहिम याने अद्याप अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. पण तरी देखील इब्राहिम याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. इब्राहिम सध्या पडद्याच्या मागे राहून काम करत आहे. चाहते देखील इब्राहिम याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
इब्राहिम याने स्वतःच्या करियरची सुरुवाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टशन’ सिनेमात इब्राहिम याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. एवढंच नाहीतर, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमात इब्राहिम याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
इब्राहिम अली खान सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर इब्राहिम याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी इब्राहिम कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतोय चाहते देखील त्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
इब्राहिम अली खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी हिला इब्राहिम डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय गर्दीत पलक हिची काळजी घेताना देखील इब्राहिम याला स्पॉट करण्यात आलं आहे.
पण अद्याप दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.