Saif Ali Khan Attack : हल्लेखोर कोणाच्या रुममध्ये घुसत असताना सैफने त्याला अडवलं

| Updated on: Jan 16, 2025 | 1:39 PM

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच्या घरात काल रात्री काय घडलं? त्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चोराला कोणाच्या खोलीत प्रवेश करताना सैफने अडवलं याबद्दल समजलं आहे. सैफ अली खान हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

Saif Ali Khan Attack : हल्लेखोर कोणाच्या रुममध्ये घुसत असताना सैफने त्याला अडवलं
Saif Ali Khan
Image Credit source: instagram
Follow us on

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री चाकू हल्ला झाला. सैफ अली खान या हल्ल्यात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी वांद्र्याच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 12 व्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरात चोर घुसलाच कसा? असा प्रश्न निर्माण होतोय. कारण एका रहिवाशी इमारतीत चोराने घरात घुसून अशा प्रकारे हल्ला करणं ही साधी बाब नाहीय. आता टाइम्स ऑफ इंडियाने लोकमतच्या हवाल्याने चोर सैफच्या घरात घुसल्यानंतर तिथे काय घडलं? यासंबंधी वृत्त दिलं आहे. चोर सैफ अली खानचा लहान मुलगा ‘जेह’च्या रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता.

त्यावेळी जेहची देखभाल करणाऱ्या केअर टेकरची त्या चोरावर नजर पडली. तिने आरडाओरडा सुरु केला. त्या गोंधळामुळे सैफ अली खानला जाग आली. सैफ खोलीच्या बाहेर आला. त्यावेळी त्याची हल्लेखोरासोबत झटापट झाली. त्यात तो जखमी झाला. हल्लेखोराने धारदार शस्त्राने सैफ अली खानवर सहा वार केले. त्यापैकी दोन जखमा खोलवर झाल्या होत्या. एक जखम त्याच्या पाठीच्या कण्याजवळ होती. सैफ अली खानला रुग्णालयात आणलं, त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सैफच्या घरी त्यावेळी कोण-कोण होतं?

वांद्रे पोलीस पथकाने सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला पोलीस ठाण्यात आणले असून तिची चौकशी केली जात आहे. जेव्हा ती व्यक्ती घरात शिरली, तेव्हा मोलकरणीने ते पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला, त्यानंतर त्यावेळी घरात उपस्थित असलेला सैफ अली खान तेथे पोहोचला. घटना घडली तेव्हा सैफ, करीना आणि मुलं घरीच होती. सैफ अली खानची मोलकरीण ‘अरियामा फिलिप्स उर्फ ​​लीमा’ हिची पोलीस चौकशी करत आहेत. सैफच्या घरात घडलेल्या या घटनेच्या तपासासाठी आठ तपास पथक नेमण्यात आली आहेत.