स्क्रिनरायटर आणि अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांची एक मुलाखत सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीत सलीम खान यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मुलाखतीत सलीम खान यांनी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. सांगायचं झालं तर सलीम खान कायम त्यांच्या मुलांच्या चांगल्या – वाईट काळात सोबत असतात.
आता सलीम खान यांची जी मुलाखत चर्चेत आहे. त्यामध्ये त्यांनी सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान यांच्या रागीट स्वभावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत सलीम यांनी, ‘तुमच्यातील असा एक गुण जो तुमच्या मुलांमध्ये देखील आहे?’ यावर उत्तर देत सलीम खान म्हणाले, ‘त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवणं…’
पुढे सलीम खान म्हणाले, ‘स्वाभाव रागीट असेल तरी काही हरकत नाही. पण राग योग्य ठिकाणी दाखवता आला पाहिजे. राग अनुवांशिक समस्या आहे जी माझ्या मुलांमध्ये देखील आली आहे. पण राग कसा नियंत्रित ठेवला पाहिजे हे शिकता आलं पाहिजे. नाहीतर, चांगल्या गोष्टी देखील खराब होतात. दारु प्यायल्यानंतर काही सांगायलाच नको. दारु पिणं कंट्रोल नाही करू शकत तर, त्यांना सोडून दिलं पाहिजे..’ असं देखील सलीम खान म्हणाले.
सांगायचं झालं तर, सलमान खान याने देखील एका मुलाखतीत स्वतःच्या रागीट स्वभावाबद्दल सांगितलं होतं. सलमान खान म्हणाला होता, ‘मला खूप जास्त राग येतो. राग म्हणजे असं नाही की, मी बाटली घेऊन कोणाच्या डोक्यात घालतो. रागात मी शॉरट टेम्पर होतो. कधी बीपीचा त्रास देखील होतो.’
‘रागात काही गोष्टी योग्य आहेत की अयोग्य तुम्हाला माहिती नसतं. तुम्हाला होणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवायचं असतं पण तसं होत नाही. हा राग आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलीम खान यांच्या मुलाखतीची चर्चा रंगली आहे.
सलीन खान म्हणाले होते, ‘काही विषय भावनात्मक असतात. त्यावर कोणतंही समाधान नसतं. सलमान आणि विवेक दोघे तेव्हा भावनात्मक होते. दोघांना नंतर जाणीव होईल की, कोणताच अर्थ नसलेल्या गोष्टीवर त्यांचे वाद झाले आहेत. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला आणि दोघे तिथेच राहिले…’ ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी मोठा खुलासा केला.