मुंबई : अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमान याने आतापर्यंत अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्याचे काही सिनेमे प्रेक्षकांना प्रचंड आवडले तर काही सिनेमे फेल ठरले. पण भाईजानच्या लोकप्रियतेत घट झालेली आहे. दिवसागणिक अभिनेत्याच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या सलमान खान याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. पण सलमान खान घाबरला नाही. मुंबई पोलिसांनी अभिनेत्याची सुरक्षा वाढवली आहे, तर दुसरीकडे भाईजान याने बुलेटप्रुफ गाडी देखील घेतली आहे. पण सलमान खान याला नुकसान कोण पोहोचवू शकतं… यावर अभिनेत्याने वडील सलीम खान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर सलीम खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता अरबाज खान, सलीम खान यांना सलमान खान याच्या प्रसिद्धीबद्दल विचारतो. यावर सलीम खान म्हणतात, ‘जेव्हा मी सलमान खान याचा पहिला सिनेमा पाहिला तेव्हा मला वाटलं तो १०० टक्के एक उत्तम कलाकार होवू शकतो… शिवाय त्याचा स्वभाव देखील मला ठावूक आहे. तो कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेत नाही…’
‘स्टार होण्याची सलमान खानमध्ये १०० टक्के क्षमता आहे… हे मला माहित होतं. पण त्याला कोणी नुकसान पोहोचवू शकतं, तर तो स्वतः आहे. आज देखील पुढील करियरचा त्याने विचार केला, तर तो फार प्रगती करू शकतो… त्याच्या स्वभावानमुळे त्याचं नुकसान होतं..’
पुढे सलीम खान म्हणाले, ‘एक अभिनेता म्हणून त्याच्यामध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. सलमानमध्ये आत्मविश्वास आहे, प्रगती दिसत आहे. सुलतान सिनेमातील त्याची भूमिका उल्लेखणीय होती. बजरंगी भाईजान सिनेमा देखील उत्तम होता. जर त्यानी स्क्रिप्टची योग्य निवड केल्यानंतर आजही तो फार पुढे जाईल…’ असं सलीम खान मुलाबद्दल म्हणाले.
सलमान खानचा तुम्हाला गर्व वाटतो का? अरबाजने असा प्रश्न विचारल्यानंतर सलीम खान म्हणाले, ‘गर्व तर वाटेलच… कारण मुलगा जेव्हा वडिलांपेक्षा पुढे जातो, तेव्हा वडिलांसाठी ती फार मोठी गोष्ट असते…’ सध्या सर्वत्र सलीम खान आणि अरबाज खान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सलमान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला आहे. ईदच्या मुहूर्तावर सिनेमाने तगडी कमाई केली. पण त्यानंतर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवली.