Salman Khan Father Salim Khan: अभिनेता सलमान खान याचे वडील आणि लेखक सलीम खान आजही त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सलीम खान विवाहित आणि चार मुलांचे वडील असताना देखील त्यांनी दुसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतला. 1981 मध्ये सलीम खान यांनी अभिनेत्री हेलन यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. सलीम खान यांनी दुसरं लग्न केल्यानंतर पहिली पत्नी सलमा खान यांना फार मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर, वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर सलमान खान आणि भावंडं देखील नाराज होती.
समील खान यांनी का केलं दुसरं लग्न?
सांगायचं झालं तर, पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर हेलन यांची आर्थिक परिस्थीती बिकट होती. हेलन यांच्या कठीण काळात सलीम खान यांनी अभिनेत्रीची प्रचंड मदत केली. ज्यामुळे सलीम खान आणि हेलन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या होत्या.
दुसऱ्या लग्नावर सलीम खान म्हणाले होते, ‘आमच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. हेलन हिच्या चारित्र्यावर कोणी बोट ठेऊ नये आणि बदनामीच्या भीतीमुळे हेलन यांच्यासोबत लग्न करावं लागलं. हेलनचं माझ्यावर प्रेम होतं. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणत्याचं भावना नव्हत्या…’ असं देखील सलीम खान म्हणाले होते.
सलीम खान यांच्यानुसार हेलन यांची बदनामी होण्यापासून वाचवण्यासाठी दुसरं लग्न केलं. पण दुसऱ्या लग्नामुळे पहिली पत्नी सलमा खान यांच्यासोबत असलेल्या नात्याला तडा गेला… नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नामुळे सलमा खान नाराज झाल्या होत्या. पण वेळेनुसार सर्वकाही ठिक झालं.
वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर सलमान खान याने देखील मोठं वक्तव्य केलं होतं. सलमान खान म्हणाला होता, ‘वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे आई प्रचंड दुःखी होती. आईला त्रासात पाहून मी वडिलांचा द्वेष करु लागलो होतो…’ असं देखील सलमान खान म्हणाला होता.
प्रेम नारायण अरोरा यांच्यासोबत हेलन यांचं पहिलं लग्न झालं होतं. प्रेम नारायण अरोरा यांच्यासोबत लग्न झालं तेव्हा हेलन फक्त 19 वर्षांच्या होत्या. दोघांनी 1957 साली लग्न झालं होतं. हेलन यांचं पहिलं लग्न त्यांच्या 35 व्या वाढदिवशी तुटलं. प्रेम नारायण अरोरा आणि हेलन यांचं लग्न फक्त 16 वर्ष टिकलं.
रिपोर्टनुसार, प्रेम नारायण अरोरा यांच्यावर आरोप होते की, ते हेलन यांच्या पैशांवर आनंद घ्यायचे. त्यांनी हेलन यांचं सर्व पैसे देखील स्वतःच्या नावावर केले होते. घराचं भाडं भरण्यासाठी देखील हेलन यांच्याकडे पैसे नव्हते. हेलन पूर्णपणे कंगाल झाल्या होत्या. अशा वेळी हेलन यांच्या मदतीसाठी सलीम खान पुढे आले होते.