सलमान खान गोळीबारानंतर दुबईत ‘या’ गोष्टीचा घेतोय आनंद, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Apr 20, 2024 | 10:04 AM

Salman Khan | गोळीबाराच्या घटनेनंतर पूर्ण सुरक्षेसोबत दुबईत पोहोचला सलमान खान, 'या' गोष्टीचा घेतोय आनंद, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा... चाहत्यांनी देखील केला लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव...

सलमान खान गोळीबारानंतर दुबईत या गोष्टीचा घेतोय आनंद, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचा गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर येताच अनेक सेलिब्रिटी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग‌ॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जात सलमान खान याची भेट घेतली. घडलेल्या घटनेला 4 ते 5 दिवस देखील उलटले नसताना अभिनेत्याने त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता दुबईत असल्याचं दिसत आहे.

एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुबईला पोहोचलो. कार्यक्रमातील अभिनेत्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये सलमान कार्यक्रमात अभिनेत्री एलनाज नौरोजीच्या बेली डान्सचा आनंद घेताना दिसत आहे. सलमानचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

 

 

सलमान खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी देखील अभिनेत्याच्या व्हायरल व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. दुबईत एका कार्यक्रमाच्या लॉन्चिंगमध्ये एलनाज नौरोजीने बेली डान्स केला.

सलमान खानही तिथे उपस्थित होता. इतर पाहुण्यांसोबत आरामात बसून सलमान अभिनेत्रीच्या बेली डान्स आनंद घेताना दिसला. एलनाज नौरोजी हिने ‘दिलबर’च्या अरबी गाण्यावर डान्स केला. अभिनेत्री डान्स करत असताना सलमान खान देखील गाताना दिसला… सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार  

रविवारी पहाटे सलमान  खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर दोघांनी गोळीबार केला. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. झालेल्या गोळीबारावर अभिनेता अरबाज खान, वडील सलिम खान यांनी वक्तव्य केलं आहे. पण सलमान खान याने झालेल्या गोळीबारावर मौन बाळगलं आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. एवढंच नाहीतर, अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे.

सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर चाहते देखील चिंतेत होते. पण आता सलमान याला पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील दिलासा मिळाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे.