Lawrence Bishnoi Hit List: गुंड लॉरेन्स बिष्णोई याचं नाव गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आली. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी देखील लॉरेन्स बिष्णोई याने घेतली आहे. 700 हून अधिक सदस्य असल्याचा दावा करणारी ही टोळी जुन्या शत्रूंच्या विरोधात तर सक्रिय आहेच पण आता त्यात नवीन नावेही समोर येऊ लागली आहेत. लॉरेन्सच्या आतापर्यंतच्या हिटलिस्टमध्ये कोणती नावं आहेत ते जाणून घेऊया.
अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिष्णोई गँगच्या हिटलिस्टवर आहे. काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान आणि लॉरेन्स यांच्यामध्ये वाद सुरु झाले. लॉरेन्सने अनेकदा सलमान खान याला जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. शिवाय दहशत निर्माण करण्यासाठी भाईजानच्या घराबाहेर गोळीबार देखील करण्यात आला.
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झीशान सिद्दीकी देखील बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आहे. टोळीतील गुन्हेगारांनी झीशानला यांना देखील लक्ष्य केल्याची कबुली दिली आहे, मात्र झीशान यांचा खून करण्यापूर्वीच वडिलांची हत्या करण्यात आली.
मुनव्वर यांच्यावर शोमध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप होता, त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या धमकीनंतर मुनव्वरने स्वतःच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. मुनव्वर देखील लॉरेन्स बिष्णोईच्या निशाण्यावर आहे.
गर्लफ्रेंडचे 35 तुकडे करुन जंगलात फेकणारा आफताब पूनावाला देखील लॉरेन्स बिष्णोईच्या निशाण्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिहार तुरुंगात बंद असलेल्या आफताब बिष्णोई गँगकडून धमक्याही येत आहेत. गेल्या महिन्यात एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्याला बिश्नोई टोळीपासून धोका आहे. अशा परिस्थितीत आता तिहार तुरुंगातील त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिष्णोई याच्या निशाण्यावर असलेल्या व्यक्तींच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. विनोदी कलाकारांपासून ते राजकीय नेते आणि गुन्हेगारांपर्यंत टोळीचं जाळं पसरलं आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं आता सुरक्षा यंत्रणांसाठी अधिक महत्त्वाचं झालं आहे. कारण या टोळ्या आता केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सक्रिय झाल्या आहेत.