मुंबई | 29 जुलै 2023 : अनेक वर्षांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांचे मार्ग वेगळे झाले. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. सोशल मीडियावर देखील आजही दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. ऐश्वर्या आणि सलमान यांच्या ब्रेकअपबद्दल सर्वांना माहिती आहे. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी फक्त ऑनस्क्रिन नाही तर, ऑफस्क्रिन देखील डोक्यावर घेतलं. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या सेटवर सुरु झालेली दोघांच्या लव्हस्टोरीचा अंत ‘देवदास’ सिनेमाच्या सेटवर झाला.. आता ‘देवदास’ सिनेमासंबंधीत एक किस्सा समोर येत आहे. ज्यामध्ये सलमान अभिनेत्रीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये नशेत जमिनीवर पडून असायचा असं देखील सांगण्यात आलं.
प्रसिद्ध पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी स्वतःच्या बायोग्राफीमध्ये ‘देवदास’ सिनेमाच्या शुटींग दरम्यान घटलेल्या काही घटना सांगितल्या आहेत. अनुपमा चोप्रा यांच्या पुस्तकातील एका घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. तेव्हा सलमान आणि ऐश्वर्या यांच्यामधील वाद टोकाला पोहोचले होते. नातं सुधारण्यासाठी सलमान खान प्रयत्न करत होता.
सलमान देवदास सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये नशेत पडलेला असायचा. दोघांचं नातं शेवटच्या टप्प्यावर येवून पोहोचलं होतं. पण ऐश्वर्या हिला आयुष्यात पुढे जायचं होतं. तर सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात पूर्ण उद्ध्वस्त झाला होता. अशात, ‘देवदास’ सिनेमात महत्त्वाची भूमिका मिळवण्यासाठी सलमान पूर्ण प्रयत्न करत होता.
पण संजय लिला भंसाळी यांनी मुख्य भूमिकेसाठी अभिनेता शाहरुख खान याची निवड केली. पण तरी देखील सलमान ‘देवदास’ सिनेमाच्या सेटवर सतत यायचा. पण देवदास सिनेमात एक लहान भूमिका साकारण्याची संधी सलमान खान याला मिळाली. देवदास सिनेमातील एका सीनमध्ये शाहरुख ऐश्वर्या हिच्या पायातून काटा काढताना दिसत आहेट..
पण अभिनेत्रीच्या पायातून शाहरुख याने नाही तर, सलमान खान याने भूमिका साकारली होती. सलमान खान याने सीनचा डेमो दिला होता. सलमान डेमो देत असताना दिग्दर्शकाने कॅमेरा सुरु ठेवला होता. रिपोर्टनुसार संजय लिला भंसाळी यांनी सिनेमातील सलमान खान याचा सीन डिलिट केला नाही. फक्त शाहरुख याचा चेहरा दाखवण्यासाठी काही बदल करण्यात आले. असं देखील सांगण्यात आलं.