Salman Khan – Akshay Kumar यांनी असं काय केलं? ज्यामुळे चाहत्यांकडून थेट ‘या’ गोष्टीची मागणी

| Updated on: Feb 05, 2023 | 7:56 AM

सलमान खान - अक्षय कुमार यांनी एकत्र येवून असं काय केलं? खास व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांची 'ही' मागणी पूर्ण करतील खिलाडी कुमार आणि भाईजान?

Salman Khan - Akshay Kumar यांनी असं काय केलं? ज्यामुळे चाहत्यांकडून थेट या गोष्टीची मागणी
Salman Khan - Akshay Kumar यांनी असं काय केलं? ज्यामुळे चाहत्यांकडून थेट 'या' गोष्टीची मागणी
Follow us on

Salman Khan – Akshay Kumar : अभिनता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. सलमान, शाहरुख, अक्षय यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्यांनी एन्ट्री केली. पण आजही ९० च्या दशकातील अभिनेत्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येते. सध्या १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैं खिलाडी तू अनाडी’ सिनेमा तुफान चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण आहे ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या आयकॉनिक गाण्याचं रिक्रिएशन. अक्षय कुमार याच्या आगामी ‘सेल्फी’ सिनेमात ‘मैं खिलाडी तू अनाडी’ गाण्याचं रिक्रिएशन चाहत्यांना अनुभवता येणार आहे. सध्या ‘मैं खिलाडी तू अनाडी’ सलमान आणि अक्षय यांनी गाण्यावर जोरदार ठेका धरला. सध्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महत्त्वाचं म्हणजे ‘मैं खिलाडी तू अनाडी’ चं नावं गाणं प्रदर्शित झालं आहे, तेव्हा पासून प्रत्येक जण गाण्यावर रिल्स बनवत आहे. अशात अक्षय कुमार याने सलमान खान याच्यासोबत ‘मैं खिलाडी तू अनाडी’ गाण्यावर रिल बनवला आहेत. सध्या सर्वत्र दोघांच्या डान्सची चर्चा आहे. ‘मैं खिलाडी तू अनाडी’ ठेका धरताना शूट केलेला व्हिडीओ खु्द्द खिलाडी कुमार याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

 

 

व्हिडीओमध्ये दिसणारी खिलाडी कुमार आणि भाईजान यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्स वर्षाव केला. फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील दोघांच्या व्हिडीओवर प्रेम व्यक्त केलं आहे. अनेक वर्षांनंतर दोघांना पुन्हा एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींना देखील प्रचंड आनंद झाला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघांना पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे. त्यामुळे आता सलमान आणि अक्षय पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर एकत्र येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर एक चाहता व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘काही तरी मोठं होणार आहे खिलाडी + भाईजान…’, अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘मी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आनंदाने ओरडत आहे..’ सध्या सर्वत्र खिलाडी कुमार आणि भाईजान यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.

‘मैं खिलाडी तू अनाडी’ या गाण्यात अक्षय कुमार याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान याने ठेका धरला. आता गाण्याच्या रिक्रिएशनमध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाशमी झळकणार आहे. अक्षय कुमार याचा आगामी सिनेमा ‘सेल्फी’ 24 फेब्रुवारी, 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘सेल्फी’ सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रायव्हिंग लायसेंस’ सिनेमाचा रिमेक असणार आहे. ‘सेल्फी’ सिनेमा कॉमेडी ड्रामा भोवती फिरताना दिसणार असून राज मेहता यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात डायना पेंटी (Diana Penty) आणि नुसरत भरूचा (Nushrat Bharucha) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.