जया बच्चन यांच्यावर संतापला सलमान खान, म्हणाला त्यांचं डोकं…

| Updated on: Aug 17, 2024 | 6:52 PM

अभिनेता सलमान खान याने जया बच्चन यांना सडेतोड उत्तर दिले आहे, सलमान खान यांचे वडील सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याबाबत जया बच्चन यांनी वक्तव्य केले होते. जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर आता सलमान खानने उत्तर दिले आहे. तो म्हणाले की, हे लोकं मुर्ख झाले आहेत.

जया बच्चन यांच्यावर संतापला सलमान खान, म्हणाला त्यांचं डोकं...
Follow us on

सलमान खान हा बॉलीवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे. सलमान खानने त्याचे वडील सलीम खान आणि लेखक जावेद अख्तर यांच्यासोबत अँग्री यंग मॅनच्या ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली. जिथे त्याने काही लोकांना सडेतोड उत्तर दिले. ज्या लोकांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना भ्रष्ट म्हटले होते. या लोकांमध्ये ज्येष्ठ हिंदी सिने अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. जया बच्चन नेहमीच आपल्या बेताल वक्तव्यांमुळे आणि रागामुळे चर्चेत असतात. एवढेच नाही तर सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या जोडीबद्दलही त्यांनी भाष्य केले होते.

काही काळापूर्वी जया बच्चन यांनी जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या जोडीबद्दल एक वक्तव्य केले होते. ज्यामुळे सलमान खान संतापला. त्याने देखील यावर चोख उत्तर दिलंय. अँग्री यंग मॅन या माहितीपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी जया बच्चन यांनी सलीम आणि जावेद यांना असभ्य आणि बिघडलेले असं म्हटलं होतं.

यावर नाव न घेता नाराजी व्यक्त करत सलमान खानने असेही म्हटले की असे म्हणणारे लोक पूर्णपणे वेडे आहेत. अभिनेता सलमान खान म्हणाला की, “ज्या कारणांमुळे लोकं त्याच्या वडिलांसोबत काम करू शकले नाहीत. मग ते तारखांचा अभाव असो किंवा त्यांना कथानक आवडले नाही किंवा त्यांना त्यांचा चेहरा आणि पात्र आवडले नाही. यामागे काही कारण असू शकते.

यावर पुढे बोलताना सलमान खान म्हणाला की, पण त्यांनी वडिलांना मी मनाबाहेर असल्याचे सांगून चिडवायला सुरुवात केली. पण “वास्तविक, जे लोक हे बोलत होते ते चुकीचे ठरले. त्यांचे वडील आणि जावेद अख्तर एकापाठोपाठ एक हिट चित्रपट लिहीत होते आणि त्यामुळेच त्यांनी अनेक निर्मात्यांना आणि अभिनेत्यांना नकार दिला होता”

सलमान म्हणाला की, “या कारणांमुळे लोक त्यांना वेगवेगळे टॅग देऊ लागले. हे लोक खूप चांगले काम करत होते, त्यामुळे हे लोक नाराज झाले नाहीत.” अँग्री यंग मॅन डॉक्युमेंट्रीबद्दल सांगायचे झाले तर, हा सलीम आणि जावेद यांच्या मैत्रीशिवाय त्यांच्या कारकिर्दीवर आणि चित्रपटांवर आधारित आहे.

अँग्री यंग मॅन नावाचा हा डॉक्युमेंट्री प्राइम व्हिडिओवर वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे. याशिवाय या डॉक्युमेंट्रीच्या ट्रेलर लाँचच्या वेळी सलीम खान आणि जावेद अख्तर यांची जोडी वर्षांनंतर एकत्र दिसली होती.