मुंबई | 23 जुलै 2023 : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सध्या चांगलाच गाजत आहे. बिग बॉसच्या घरात जेव्हा जिया शंकरने एल्विश यादवला साबणाचं पाणी प्यायला दिलं, तेव्हा प्रेक्षक खूप भडकले होते. या वागणुकीनंतर स्पष्टीकरण देताना जिया म्हणाली की ते करण्याआधी तिने फारसा विचार केला नव्हता. उलट पाण्यात काहीतरी मिसळलंय हे एल्विशलाच समजलं नाही असं म्हणत तिने त्याला दोष दिला. आता ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खानने जिया शंकरची चांगलीच शाळा घेतली. या कृत्याविषयी माफी मागताना जेव्हा जिया हसली तेव्हा सलमानला आणखी राग आला. “बत्तीशी दाखवल्यानंतर कोणी क्षमस्व राहत नाही”, अशा शब्दांत त्याने जियाला फटकारलं.
सलमानने आधी जियाला पाण्यात मिरचीची पावडर मिसळून तिला प्यायला दिलं. ती पिण्याआधीच सलमानने तिला थांबवलं आणि इतरांना त्रास न देण्याविषयी समजावलं. यावेळी सलमानने हँडवॉशमध्ये काय काय मिसळलेलं असतं आणि ते पाण्यास मिसळून प्यायल्यास त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो ते त्यांने सांगितलं. असं करण्यामागचा तुझा उद्देश काय होता, असाही सवाल त्याने जियाला केला.
Shame on Jiya for her shocking actions that have left us all speechless. The truth must be revealed! How could a person laugh after giving soap water to drink.#ShameOnJiya #ElvishYadav pic.twitter.com/UQj3TuT6dg
— Vote For Elvish ? (@VoteForElvish) July 18, 2023
“जिया माफी मागितल्यानंतरही तू हसत आहेस. हे पहा, माफी मागण्याची ही काही पद्धत नाही. बत्तीशी दाखवून कोणीच क्षमस्व होत नाही. कोणी हसत एखाद्याला माफी मागत नाही”, असं तो तिला म्हणतो. त्यावर जिया सलमानला स्पष्टीकरण देते की ती हसत जरी असली तरी तिला तिच्या कृत्याचं वाईट वाटतंय. यानंतर ती पुन्हा एकदा एल्विशची माफी मागते.
एल्विशने बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री घेतली होती. घरातील एका टास्कदरम्यान त्याला इतर स्पर्धकांवर हुकूम गाजवण्यास सांगण्यात आलं होतं. घरातील इतर स्पर्धकांना एल्विशचे सर्व आदेश पाळायचे होते. अशातच जेव्हा तो जियाला पिण्यासाठी पाणी मागतो, तेव्हा ती त्यात हँडवॉश मिसळून त्याला प्यायला देते. एल्विशला याची काहीच कल्पना नसते आणि तो ते पाणी पितो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जिया शंकरला प्रचंड ट्रोल केलं होतं. ‘शेम ऑन जिया’ असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला होता. ‘कोणी इतकं वाईट कसं असू शकतं’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘ही अत्यंत वाईट वागणूक आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं होतं.