Salman Khan| ‘भाई जेव्हा गोळी अंगावर घ्यायची वेळ येईल तेव्हा…’, सलमान खान याच्यासाठी काहीही करणारा ‘तो’ कोण?

| Updated on: May 21, 2023 | 2:26 PM

सलमान खान याच्यासाठी काहीही करायला तयार असणारा 'तो' कोण... थेट म्हणाला, 'भाई जेव्हा गोळी अंगावर घ्यायची वेळ येईल तेव्हा...', त्याला नाही स्वतःच्या प्राणाची चिंता...

Salman Khan| भाई जेव्हा गोळी अंगावर घ्यायची वेळ येईल तेव्हा..., सलमान खान याच्यासाठी काहीही करणारा तो कोण?
Follow us on

मुंबई : अभिनेता सलमान खान याचं बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात असलेलं स्थान फार मोठं आहे. ‘सलमान खान आनंदाच्या क्षणी येणार नाही, पण जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा मदतीसाठी भाईजान कायम पुढे असतो..’ असं वक्तव्य अनेक सेलिब्रिटींना सलमान खान याच्याबद्दल केलं आहे. शिवाय सलमान खान याने अनेक नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी देखील दिली आहे… सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सलमान खान चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्न करत असतो… बॉलिवूडमध्ये सलमान खान याच्या मित्रांची संख्या देखील फार मोठी आहे.. पण आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी जी आपल्यासाठी काहीही करायला तयार होईल… सलमान खान याच्या आयुष्यात देखील अशी एक व्यक्ती आहे, जी सलमान खान याच्यासाठी अंगावर गोळ्या घेण्यासाठी देखील तयार आहे…

सलमान खान याच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भाईजानचा बॉडीगार्ड शेरा आहे… गेल्या १५ वर्षांपासून शेरा सलमान खान याची सावली म्हणून जगत आहे… असं म्हणायला काहीही हरकत नाही. सध्या शेराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शेराने सलमान खान याच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना भावुक करणाऱ्या आहेत…

हे सुद्धा वाचा

 

 

सलमानबद्दल शेरा म्हणाला, ‘सर्वांना माहिती आहे मी गेल्या १५ वर्षांपासून भाईसोबत राहत आहे. आता अनेक माध्यमांच्या व्यक्ती देखील माझे मित्र झाले आहेत. मी १५ वर्षांपासून भाईला सांगत आहे. जेव्हा गोळी अंगावर घ्यायची वेळ येईल तेव्हा तुझा बॉडीगार्ड तुझ्यासमोर उभा राहिल.. पण खरं सांगायचं झालं तर भाई काहीही करु शकतो…’

शेरा पुढे म्हणाला, ‘भाई त्याच्या चाहत्यांसाठी काहीही करु शकतो आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा एक नाही दहा, पंधरा गोळ्या अंगावर घेण्यासाठी मी तयार असेल…’ असं देखील शेरा म्हणाला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय अनेक चाहते व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत… व्हिडीओ beingsalmankha_25 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे..

दरम्यान, अभिनेता सलमान खान याला १८ मार्च रोजी जीवे मारण्याची धमकी दिली. एका ई-मेलच्या माध्यमातून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकीच्या ईमेल अगोदर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने जेलमधून एका मुलाखती वेळी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मुंबई पोलिसांनी वाढ केली. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याला Y + दर्जाची सुरक्षा दिली आहे.