मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेता ‘किसी का भाई किसी की जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना महिलांनी सेटवर नेकलाईन ड्रेस घालू नये… असा सलमान खान याचा नियम होता… असं अभिनेत्री पलक तिवारी म्हणाली. यामुळे सर्वत्र चर्चा देखील रंगली. आता महिलांच्या कपड्यांवर खु्द्द सलमान खान याने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच अभिनेत्याने एका मुलाखतीत अनेक गोष्टींच्या खुलासा केला. दरम्यान, महिलांच्या कपड्यांबद्दल देखील अभिनेत्याने स्वतःचं मत मांडलं आहे. मुलाखतीत सलमानला विचारलं की, ‘सेटवर महिलांनी डिसेंट आणि नेकलाईन ड्रेस घालू नये असे नियम होते का?’
मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही एक डिसेंट सिनेमा बनवता, तेव्हा पूर्ण कुटुंबासोबत तो सिनेमा पाहिला जातो. महिलांचं शरीर फार किंमती आहे. त्यामुळे मला असं वाटतं महिलांचं शरीर जितकं झाकलेलं तितकंच योग्य आहे…’
पुढे सलमान खान म्हणाला, ‘सध्याचं वातावरण…, ही गोष्ट मुलींबद्दल नाही तर ही गोष्ट मुलांबद्दल आहे… मुलं ज्याप्रमाणे मुलींकडे पाहतात… आपल्या बहिणी, पत्नी, आणि आईसाठी बिलकूल योग्य नाही…’ असं अभिनेता मुलाखतीत म्हणाला. सध्याची परिस्थिती पाहता लोकांनी तुला काय सांगाचं आहे… असा प्रश्न देखील अभिनेत्याला मुलाखतीत विचारण्यात आला…
यावर अभिनेता म्हणाला, ‘कधी-कधी लोकांची नियत बदलते… त्यामुळे सिनेमा तयार करण्यामागे एकच उद्देश असतो, तो म्हणजे लोकांनी महिलांकडे वाईट नजरेने पाहू नये… ‘ सध्या सलमान खान त्याच्या वक्तव्यामुळे तुफान चर्चेत आहे.
नुकताच, सलमान खान याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या सीरिज आणि सिनेमांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. “मला खरंच वाटतं की ओटीटीवर सेन्सॉरशिप असायला हवं. अश्लीलता, न्युडिटी, शिवीगाळ हे सर्व बंद झालं पाहिजे. आता सर्वकाही फोनवर उपलब्ध झालंय. 15 किंवा 16 वर्षीय मुलाने पाहिलं तर आपण समजू शकतो. पण तुमच्या छोट्या अभ्यास करणाऱ्या मुलीने हे सर्व पाहिलं तर कसं वाटेल? त्यामुळे ओटीटीवर जो कंटेट स्ट्रीम होतो, त्याला एकदं तपासलं पाहिजे, असं माझं मत आहे. हा कंटेट जितका साफ असेल, तितकं चांगलं”, असं सलमान खान म्हणाला.