Seema Sajdeh Love Life: अभिनेता सलमान खान याचा लहान भाऊ सोहैल खान याचं खासगी आयुष्य गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सोहैल खान याला घटस्फोट दिल्यानंतर सीमा सजदेह हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. घटस्फोटानंतर सीमा हिने पून्हा एक्स-बॉयफ्रेंडला डेट करण्यास सुरुवात केली आहे. सीमा हिच्या बॉयफ्रेंडचं नाव विक्रम असं आहे. सध्या सीमा ‘लाइव्स वर्सेज बॉलीवुड वाइव्स’ शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे. नुकताच सीमाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
खासगी आयुष्याबद्दल सीमा म्हणाली, ‘आता मी तरुण नाही. माझा एक इतिहास आहे. मला दोन मुलं आहे आणि माझ्या पार्टनरला देखील दोन मुलं आहे. आमच्या नात्यामध्ये अन्य लोकांचा देखाल समावेश आहे… तुम्ही जेव्हा तरुण असता तेव्हा गोष्टी वेगळ्या असतात.’
‘पण आयुष्यात पुढे गेल्यानंतर सर्वांच्या भावनांचा आणि संवेदनांचा विचार करावा लागतो. मी सर्व गोष्टी अशक्य आहेत असं म्हणणार नाही. पण काही गोष्टींसाठी सावधान राहावं लागलं.’ असं देखील सीमा म्हणाली. शिवाय घटस्फोटानंतर एकट्या महिलेच्या आयुष्याबद्दल देखील सीमाने मोठं वक्तव्य केलं.
‘एकट्या महिलेचं आयुष्य फार कठीण आहे. ही ‘परिस्थिती’ घातक मानसिक आरोग्याची कृती आहे. मी थोड्या जुन्या विचारधारनेची महिला आहे. कारण मी कधीच प्रासंगिक संबंधांवर विश्वास ठेवत नाही. जर कोणासोबत संबंध जोडले असतील तर, मी ते नातं टिकवण्यासाठी काहीही करेल…’ असं देखील सीमा म्हणाली.
विक्रमसोबत असलेल्या नात्यावर सीमा म्हणाली, ‘तो मला पूर्णपणे ओळखतो… विक्रम आणि माझ्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. आम्ही अशा क्षणी पुन्हा एकत्र आलो यावर विश्वास बसत नाही… आयुष्य एक चक्र आहे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, विक्रम आणि सीमा यांचा साखरपुडा झाला होता. पण आयुष्यात सोहैल याची एन्ट्री झाल्यानंतर सीमाने विक्रमला सोडलं आणि सोहैलसोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.