मुंबई : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेता ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा आणि नव्या बुलेटप्रूफ कारमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याकडे असलेली बुलेटप्रूफ कार अद्याप भारतात लाँच झालेली नाही. ही कार भारतात विकली जात नाही. त्यामुळे सलमान खानने ही कार आंतरराष्ट्रीय बाजारातून खाजगीरित्या आयात केली आहे. बुलेटप्रूफ कार भारतात आणण्यासाठी अभिनेत्याने जवळपास ४ ते ५ कोटी रुपये मोजले आहेत. सलमान खान याला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्यामुळे अभिनेत्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली. अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची बातमी ताजी असताना, सलमान याने नवीन बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही ही महागडी गाडी खरेदी केली
सलमान खान याच्या नव्या गाडीचा नंबर २७२७ असा आहे. २७ ही सलमान खान याच्या वाढदिवसाची देखील तारीख आहे. सलमान खान याचा जन्म २७ डिसेंबर १९६५ साली झाला आहे. म्हणून सलमान याच्या नव्या कारचा नंबर २७२७ असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या नव्या कारची चर्चा रंगलेली आहे.
भारताच्या रस्त्यांवर जेव्हा भाईजानची नवी चमकती कार धावत होती, तेव्हा अनेकांच्या नजरा भाईजानच्या कारकडे येवून थांबल्या. एवढंच नाही तर, मुंबईच्या रस्त्यांवर देखील भाईजानला नवीन कारमध्ये पाहण्यात आलं. निसान पेट्रोल ही निसानने बनवलेली आतापर्यंतची सर्वात महागडी SUV आहे.
सलमान खानने त्याच्या गॅरेजमध्ये पहिल्यांदाचं बुलेटप्रूफ कार आली नसून, याआधी देखील सलमानने बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. सलमानने नुकताच त्याची टोयोटा लँड क्रूझर एसयूव्ही आर्मर आणि बुलेटप्रूफ ग्लाससह अपग्रेड केली आहे.
सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
एवढंच नाही तर, किसी का भाई किसी की जान सिनेमातून अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील झळकणार आहे.